Join us

नैवेद्य स्पेशल: कांदा- लसूण न घालता करा मटार बटाट्याची रस्सा भाजी, पाहा ग्रेव्ही करण्याची सोपी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2025 12:47 IST

No onion no garlic recipes: aloo matar recipe : Satvik curry recipe: Traditional Indian curry without onion garlic : कांदा-लसूण न घालता मटार बटाट्याची रस्सा भाजी कशी करायची पाहूया.

भारतीय स्वयंपाकघरात कांदा लसणाशिवाय जेवण अपूर्णच. यामुळे पदार्थाला चव देखील येत नाही. स्वयंपाकघरात कांदा आणि लसूण यांचा वापर सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात केला जातो.(Naivedya Recipe) पण अनेकदा गणपतीसारख्या सणात किंवा इतर धार्मिक कार्यात कांदा-लसूण खाणे वर्ज्य केले जाते.(Alu mattar Recipe) पण अशावेळी भाजी चविष्ट कशी करायची असा प्रश्न गृहिणींसमोर उभा राहतो.(Traditional Indian curry without onion garlic ) पण खरे तर कांदा- लसूण न घालताही अनेक पदार्थांना अप्रतिम चव येते,यातील एक मटार बटाटा रस्सा भाजी. (Satvik curry recipe)मटार-बटाट्याचा संगम हा नेहमीच आवडीचा मानला जातो. ही रस्सा भाजी गरम फुलक्यांसोबत, भाकरीसोबत किंवा अगदी गरमागरम भातासोबतही छान लागते.(Indian vegetarian curry recipes) ही भाजी बनवायला सोपी, कमी वेळेत आणि पौष्टिक असते. सात्विक पद्धतीने केलेल्या अशा पदार्थांतून आपल्या चवीसोबत आरोग्याचाही फायदा मिळतो. कांदा-लसूण न घालता मटार बटाट्याची रस्सा भाजी कशी करायची पाहूया.

वाटीभर सायीचे घरीच करा साजूक तूप, फ्रीजमध्ये साय साठवण्याची सोपी ट्रिक- विकतपेक्षाही चांगले

साहित्य 

धने - १ छोटा कप बडीशेप - १ छोटा कप खडा मसाला काळी मिरी हिरव्या मिरच्या आलेतेल जिरे - १ चमचा मोहरी - १ चमचा तेजपत्ता - १लाल मिरची - १हिंग - १ चमचाहळद - १ चमचा लाल मिरची पावडर - १ चमचा धने पावडर - १ चमचा गरम मसाला - १ चमचा टोमॅटो प्युरी - १ वाटी मीठ - चवीनुसार बारीक चिरलेला बटाटा हिरवे वाटाणे कसुरी मेथी कोथिंबीर 

कृती 

1. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये धने, बडीशेप, खडा मसाला, काळी मिरी, हिरव्या मिरच्या आणि आले घालून त्याला जाडसर वाटून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल घालून त्यात जिरे, मोहरी, तेजपत्ता, लाल मिरची, हिंग, हळद आणि इतर सर्व मसाले घालून व्यवस्थित फ्राय करुन घ्या. 

2. मसाला व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी, मीठ, बटाटा आणि हिरवे वाटाणे घाला. सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करुन त्यात पाणी घाला. 

3. भाजीमध्ये वरुन थोडे मीठ, हिरवी मिरची, गरम मसाले, कसुरी मेथी आणि कोथिंबीर घाला. झाकण झाकूण त्यावर पाणी घाला. ज्यामुळे भाजी लवकर शिजेल. व्यवस्थित शिजल्यानंतर नैवेद्याच्या ताटात वाढा बटाटा- मटार रस्सा भाजी. 

टॅग्स :अन्नपाककृती