Join us

कोथिंबीर वडी आवडते पण बेसनाचा त्रास होतो? पाहा बेसन न वापरता कोथिंबीर वडीची कुरकुरीत रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2024 19:05 IST

How To Make a Kothimbir Vadi Without Using Gram Flour : Kothimbir Vadi Recipe : Crispy Kothimbir Vadi Recipe Using More Coriander : बेसन न घालता कधी कोथिंबीर वडी करून पाहिली आहे का?

हिवाळ्यात बाजारांमध्ये फ्रेश, ताजी, हिरवीगार कोथिंबीर फार मोठ्या प्रमाणावर विकायला असते. या दिवसांत कोथिंबीर स्वस्तही असते म्हणून काहीवेळा आपण एकदम जास्तीची कोथिंबीर आणून ठेवतो. घरात जास्तीची कोथिंबीर आणली की हमखास केला जाणारा खमंग, खुसखुशीत पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी. जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी कोथिंबीर वड्या अगदी आवडीने फस्त केल्या जातात. कोथिंबीर वड्या तयार करताना त्या व्यवस्थित वाफवून घेतलेल्या असतात यामुळे त्या फ्रिजमध्ये एक आठवड्यापर्यंत ठेवू शकता आणि लागतील तशा तळून घेऊ शकता(Kothimbir Vadi Recipe).

हिवाळ्यात वातावरणातील गारठ्यामुळे आपल्याला काही ना काही गरमागरम, चटपटीत खावंसं वाटत. अशावेळी झटपट काहीतरी तयार करून खाता येईल असा हा पदार्थ आहे. कोथिंबीर वडी करण्याची प्रत्येकीची पद्धत वेगळी असते. काहीजणी वाफवून वडी तयार करतात, तर काहीजण त्याची भजी तयार करतात. त्यात बेसनाचा वापर केला जातो. पण कोथिंबीर वडी खाण्याची इच्छा झालीस आणि बेसन घरात नसेल तर? काहीजणांना बेसन पचत नाही, ज्यामुळे ते भजी, वडे किंवा वडी खाणं टाळतात. जर आपल्याला बेसनाचा वापर न करता कोथिंबीर वडी तयार करायची असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. बेसन ऐवजी आपण तांदुळ - ज्वारीच्या पिठाचा वापर करुन पौष्टिक कोथिंबीर वडी तयार करु शकतो. बेसनाचा वापर न करता कोथिंबीर वडी कशी तयार करायची पाहूयात(How To Make a Kothimbir Vadi Without Using Gram Flour).

साहित्य :- 

१. कोथिंबीर - २ कप २. बाजरीचे पीठ - २ कप ३. तांदुळाचे पीठ - १/४ कप४. हिरव्या मिरच्या - ५ ते ६५. लसूण - ५ ते ६ लसूण पाकळ्या ६. जिरे - १ टेबलस्पून ७. ओवा - १ टेबलस्पून ८. पांढरे तीळ - १ टेबलस्पून ९. मीठ - चवीनुसार१०. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून ११. हळद - १/२ टेबलस्पून १२. पाणी - गरजेनुसार १३. तेल - तळण्यासाठी 

हिरव्यागार-कोवळ्या मेथीच्या पानांचा करा गुजराथी स्पेशल 'मेथी ना गोटा', हिवाळ्यात खा चटपटीत- पौष्टिक पदार्थ...

हिवाळ्यात दही विरजताना लक्षात ठेवा ३ गोष्टी, पातळ-पाणचट न होता विकतसारखे घट्ट दही होईल तयार...

कृती :- 

१. सगळ्यात आधी कोथिंबीर स्वच्छ धुवून ती बारीक चिरुन घ्यावी. २. आता एका मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, जिरे, लसूण, ओवा एकत्रित बारीक वाटून घ्यावे.   ३. चिरलेली कोथिंबीर एका मोठ्या डिशमध्ये घेऊन त्यात बाजरी व तांदुळाचे पीठ घालावे. ४. त्यानंतर त्यात पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला, हळद आणि हिरव्या मिरचीची मिक्सरमध्ये वाटून घेतलेली पेस्ट घालावी. 

५. सर्वात शेवटी यात गरजेनुसार पाणी घालून मिश्रण घट्ट मळून घ्यावे. ६. आता एका चाळणीला तेल लावून त्यात हे मळून घेतलेले पीठ ठेवून वाफवून घ्यावे. ७. ३० मिनिटे वाफवून घेतल्यांनंतर या तयार पिठाच्या लहान गोलाकार वड्या पाडून घ्याव्यात. ८. आता एका कढईत तेल ओतून त्यात या कोथिंबीर वड्या खरपूस तळून घ्याव्यात. 

थंडीच्या दिवसांत गरमागरम, कुरकुरीत बेसन पिठाचा वापर न करता कोथिंबीर वड्या खाण्यासाठी तयार आहेत.

टॅग्स :अन्नपाककृतीहिवाळ्यातला आहार