Lokmat Sakhi >Food > फक्त ५ मिनिटांत करा ताडगोळ्याचं सरबत! कडक उन्हातला पारंपरिक गारवा, किडनीसाठीही गुणकारी

फक्त ५ मिनिटांत करा ताडगोळ्याचं सरबत! कडक उन्हातला पारंपरिक गारवा, किडनीसाठीही गुणकारी

How to make ice apple drink at home in 5 minutes: Traditional ice apple juice recipe for summer: Summer drink that boosts kidney health naturally: नुसताच ताडगोळा खाण्याऐवजी आपण त्याचे सरबत बनवू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2025 09:05 IST2025-04-15T09:00:00+5:302025-04-15T09:05:01+5:30

How to make ice apple drink at home in 5 minutes: Traditional ice apple juice recipe for summer: Summer drink that boosts kidney health naturally: नुसताच ताडगोळा खाण्याऐवजी आपण त्याचे सरबत बनवू शकतो.

how to make 5 minutes ice apple drink at home traditional recipe for summer season benefits for kidney health | फक्त ५ मिनिटांत करा ताडगोळ्याचं सरबत! कडक उन्हातला पारंपरिक गारवा, किडनीसाठीही गुणकारी

फक्त ५ मिनिटांत करा ताडगोळ्याचं सरबत! कडक उन्हातला पारंपरिक गारवा, किडनीसाठीही गुणकारी

उन्हाळ्यात जितके आंबे खाल्ले जातात तितकाच ताडगोळा देखील खाल्ला जातो.(Traditional cooling drink) उन्हाळ्यात येणारं मऊ आणि रसदार फळ. हे फळ खायचे असेल तर याची साल काढून खाल्ले जाते.(How to make ice apple drink at home in 5 minutes) याच्या आतमध्ये रसदार पांढरा गर म्हणजे ताडगोळा . चवीला गोड आणि आरोग्यासाठी थंड असे फळ. (Healthy summer drink)
ताडगोळा किंवा आईस ॲपल म्हणून हे फळ ओळखले जाते. आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने शरीराला हायड्रेट राहण्यास मदत मिळते. (Benefits of ice apple for kidney and body cooling) ताडगोळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, ए, बी आणि ई यांसारखी जीवनसत्त्व यामध्ये आढळतात. पण नुसताच ताडगोळा खाण्याऐवजी आपण त्याचे सरबत बनवू शकतो.ताडगोळा हे नैसर्गिरित्या थंड असल्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते.(Natural remedies for kidney health with ice apple) यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवते. तसेच पचनक्रिया आणि बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कमी होतो. याची चव अगदी शहाळ्यातील पाण्यासारखी असते. आतून गोड पाणी आणि वरुन जेलीसारखे पण चवीला अगदी उत्तम. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण हे खाऊ शकतो. याचे सरबत कसे बनवता येईल पाहूया. 

आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक! पाहा पारंपरिक आंबा मोदक रेसिपी - फुटणार नाहीत, सुबक कळीदार मोदक..


साहित्य 

ताडगोळा - ४ 
साखर - २ चमचे 
थंड पाणी किंवा सोडा - २ ते ३ कप 
भिजवलेला सब्जा - २ चमचा 
मीठ - १/४ चमचा
लिंबाचा रस - १ चमचा 
बर्फ 

">

कृती 

1. सगळ्यात आधी ताडगोळे सोलून त्याचे काप करा. मिक्सरच्या भांड्यात वाटून मिश्रण तयार करा. 

2. आता एका बाऊलमध्ये ताडगोळ्याचे मिश्रण, पाणी किंवा सोडा, बर्फ, भिजवलेला सब्जा , मीठ, साखर आणि लिंबाचा रस घाला. 

3. वरील सर्व साहित्य चांगले फेटून घ्या. ग्लासमध्ये सर्व्ह करा
 

Web Title: how to make 5 minutes ice apple drink at home traditional recipe for summer season benefits for kidney health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.