Join us  

तुम्ही खात असलेली हळद भेसळयुक्त तर नाही ना? सेकंदात ओळखा नकली हळद; FSSAI सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2024 2:22 PM

How to know whether turmeric is real or fake in minutes, FSSAI told this secret trick : आजकाल बाजारात नकली हळदीची विक्री सर्रास होत आहे; अशावेळी हळद तपासूनच खरेदी करा

भारतीय मसाल्याच्या डब्यात हळदीचे विशेष स्थान आहे. पदार्थात चिमुटभर हळद घालताच; पदार्थाचा रंग, चव सर्व काही बदलते. हळद खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. खाण्याव्यतिरिक्त भारतीय लोकं जखमेवर देखील हळद लावतात. त्यामुळे हळदीचे एक नसून हजारो फायदे आणि वापर आहेत (Kitchen Tips and Tricks). पण बऱ्याचदा मार्केटमध्ये भेसळयुक्त हळद मिळते. जे आरोग्यासाठी घातक ठरू शकते (Fake-Real).  पण बाजारातून विकत आणलेली हळद खरी आहे की भेसळयुक्त? हे कसे ओळखायचे?

यासंदर्भात, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात एफएसएसएआय यांनी काही ट्रिक्स शेअर केल्या आहेत (Turmeric). या ट्रिक्सच्या मदतीने आपण खरी कोणती आणि भेसळयुक्त हळदीचा शोध लावू शकता(How to know whether turmeric is real or fake in minutes, FSSAI told this secret trick).

भेसळयुक्त हळद कशी ओळखावी?

पहिली युक्ती

भेसळयुक्त हळद ओळखण्यासाठी आपल्याला फक्त एक ग्लास पाण्याची गरज आहे. यासाठी एका काचेच्या ग्लासमध्ये साधे पाणी घ्या. त्यात एक चमचाभर हळद घाला. हळद घातल्यानंतर चमच्याने मिक्स करा. मिक्स केल्यानंतर पाण्याकडे पाहा. हळद नकली असल्यास ती काचेच्या तळाशी जमा होईल. शिवाय भेसळयुक्त हळदीचा रंग पाण्यात गडद होत जातो.

कपभर तांदुळाची करा हेल्दी-पारंपारिक खीर, चवीला जबरदस्त-बनवायला सोपी; पाहा कृती

दुसरी युक्ती

हळद भेसळयुक्त आहे की नाही, ते तपासण्यासाठी तळहातावर चिमुटभर हळद घ्या. दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने १० ते २० सेकंदासाठी चोळून घ्या. जर आपल्या तळहातावर हळदीचा पिवळा नैसर्गिक रंग लागला तर, समजून जा हळद असली आहे. या युक्तीने आपण १५ सेकंदात हळदीत भेसळ आहे की नाही, हे तपासू शकता.

कणिक मळून ठेवली की काळी पडते? कडकही होते? ५ टिप्स; कणिक राहील मऊ - पोळ्या होतील सॉफ्ट

तिसरी युक्ती

हळद असली आहे की भेसळयुक्त हे तपासण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करून पाहू शकता. एका काचेच्या ग्लासमध्ये गरम पाणी घ्या. त्यात चमचाभर हळद घालून मिक्स करा. जर हळद तळाशी जाऊन बसली तर, हळद असली आहे. जर गरम पाण्यात मिसळल्यानंतर हळद गडद रंग सोडत असेल तर, समजून जा त्यात भेसळ आहे.

टॅग्स :किचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न