Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पुदिन्याची पानं सडतात-काळी पडतात? उन्हाळ्यात पुदिना टिकेल महिनाभर- सोपी युक्ती, ताक- चटणी राहिल फ्रेश

पुदिन्याची पानं सडतात-काळी पडतात? उन्हाळ्यात पुदिना टिकेल महिनाभर- सोपी युक्ती, ताक- चटणी राहिल फ्रेश

Kitchen tips for fresh pudina: Keep pudina fresh for a long Time: आपल्यालाही महिन्याभरापेक्षा जास्त दिवस पुदिना टिकवायचा असेल तर सोपी युक्ती पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2026 16:28 IST2026-03-15T16:28:26+5:302026-03-15T16:28:59+5:30

Kitchen tips for fresh pudina: Keep pudina fresh for a long Time: आपल्यालाही महिन्याभरापेक्षा जास्त दिवस पुदिना टिकवायचा असेल तर सोपी युक्ती पाहूया.

How to keep mint leaves fresh for a month How to store mint leaves without turning black Tips to prevent mint leaves How to store pudina in fridge Pudina tikavnyachi sopi yukti Pudinyachi pana kali padne upay Pudina fresh kaisa thevava | पुदिन्याची पानं सडतात-काळी पडतात? उन्हाळ्यात पुदिना टिकेल महिनाभर- सोपी युक्ती, ताक- चटणी राहिल फ्रेश

पुदिन्याची पानं सडतात-काळी पडतात? उन्हाळ्यात पुदिना टिकेल महिनाभर- सोपी युक्ती, ताक- चटणी राहिल फ्रेश

उन्हाळा सुरु झाला की किचनमध्ये पुदिन्याचा वापर वाढतो. मग ते थंडगार ताक असो, कैरीची चटणी असो किंवा उन्हाळ्यातील खास पन्हं. पुदिन्याचा रिफ्रेशिंग सुगंध आणि चव जेवणाची रंगतच वाढवते. पण गृहिणींसमोर सगळ्यात मोठी समस्या असते ती म्हणजे पुदिना साठवण्याची.(Kitchen tips for fresh pudina) बाजारातून हिरवागार पुदिना विकत आणला की दुसऱ्या दिवशी त्याची पाने पिवळी पडतात, तो काळा पडायला लागतो. इतकंच नाही तर त्याचा वास देखील येतो. पिशवीत ठेवल्यास तो लगेच सडतो. १० रुपयांची जुडी आणली तरी त्यातला अर्धा पुदिना खराब होऊन फेकून द्यावा लागतो.(Mint storage hacks for summer)
अनेकांना वाटते की फ्रीजमध्ये ठेवल्याने पुदिना ताजा राहतो, पण चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास तो फ्रीजमध्येही काळा पडतो. १० रुपयांच्या पुदिन्याची जुडी आपण पुढचे ३ महिने अगदी आरामात वापरू शकतो.(Best way to store mint leaves in Marathi) यासाठी आपल्याला महागडे कंटेनर्स किंवा केमिकल्सची गरज नाही, तर आपल्या घरातील साध्या आणि सोप्या युक्त्या वापरून आपण पुदिना दीर्घकाळ टिकवू शकता.जर आपल्यालाही महिन्याभरापेक्षा जास्त दिवस पुदिना टिकवायचा असेल तर सोपी युक्ती पाहूया. (Kitchen hacks to keep herbs fresh)

जेवल्यानंतर पोट डब्ब होतं, फुगल्यासारखं वाटतं? AIIMS डॉक्टरांचा सल्ला, ५ उपाय- पचन सुधारेल लवकर

खरंतर उन्हाळ्यात पुदिना आणि कोथिंबीरची पाने लवकर खराब होतात, पण ती योग्य पद्धतीने साठवली तर ती बराच काळ टिकतात. बाजारातून पुदिना खरेदी केल्यानंतर सगळ्यात आधी त्याची पिवळी झालेली पाने वेगळी करा. नंतर चांगली पानं स्वच्छ कापडावर पसरवा आणि उन्हामध्ये सुकवा. दोन ते तीन दिवसात पानं व्यवस्थित सुकतील. 

पाने व्यवस्थित सुकल्यानंतर त्यांची मिक्सरमध्ये बारीक पावडर करा. ही पावडर स्वच्छ, कोरड्या आणि काचेच्या डब्यात साठवा. ही पुदिन्याची पावडर २ ते ३ महिने सहज टिकेल. अनेकजण पुदिन्याच्या काड्या देखील फेकून देतात. पण या काड्या देखील उन्हात वाळवून त्याची पावडर तयार करता येते. दुपारी ताक किंवा मठ्ठा पिताना यात थोडी पुदिन्याची पावडर घाला. यामुळे पदार्थाची चव वाढते आणि शरीराला थंडावा मिळतो. 

इतकंच नाही तर पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही पेस्ट आईस ट्रेमध्ये भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा. आपल्याला ताक किंवा पन्ह करायचं असेल तेव्हा एक क्यूब घाला.
 

Web Title : गर्मी में पुदीना रखें ताजा: स्वाद के लिए आसान भंडारण उपाय

Web Summary : इन आसान उपायों से पुदीने की ताजगी बनाए रखें। गर्मियों के पेय और व्यंजनों में लंबे समय तक स्वाद के लिए पत्तियों को सुखाएं, पाउडर बनाएं या पेस्ट को फ्रीज करें। महीनों तक पुदीने का आनंद लें!

Web Title : Keep Mint Fresh All Summer: Simple Storage Tips for Flavor

Web Summary : Preserve mint's freshness with these easy tips. Dry leaves, make powder, or freeze paste for long-lasting flavor in summer drinks and dishes. Enjoy mint for months!