Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात दूध लवकर नासू नये म्हणून १ युक्ती, दूध तापवताना घाला १ गोष्ट- फ्रीजशिवायही राहील चांगले

उन्हाळ्यात दूध लवकर नासू नये म्हणून १ युक्ती, दूध तापवताना घाला १ गोष्ट- फ्रीजशिवायही राहील चांगले

Unhalyat dudh tikuon thevnyache upay: Dudh nasu naye mhanun kay karave: जाणून घेऊया उन्हाळ्यात फ्रीजशिवाय दूध ताजे ठेवण्याच्या काही खास टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2026 12:58 IST2026-03-23T12:57:03+5:302026-03-23T12:58:05+5:30

Unhalyat dudh tikuon thevnyache upay: Dudh nasu naye mhanun kay karave: जाणून घेऊया उन्हाळ्यात फ्रीजशिवाय दूध ताजे ठेवण्याच्या काही खास टिप्स

How to keep milk fresh without fridge in summer Tips to prevent milk from curdling in hot weather Kitchen hacks to store milk longer How to stop milk from spoiling in summer Milk boiling tips for long-lasting freshness | उन्हाळ्यात दूध लवकर नासू नये म्हणून १ युक्ती, दूध तापवताना घाला १ गोष्ट- फ्रीजशिवायही राहील चांगले

उन्हाळ्यात दूध लवकर नासू नये म्हणून १ युक्ती, दूध तापवताना घाला १ गोष्ट- फ्रीजशिवायही राहील चांगले

उन्हाळा सुरु झाला की स्वयंपाकघरात असणाऱ्या अनेक पदार्थांची आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. या काळात किचनमधली सर्वात मोठी समस्या म्हणजे दूध फाटणे किंवा नासणे. कडाक्याच्या उन्हात आणि वाढत्या तापमानामुळे दूध फार काळ टिकत नाही.(Unhalyat dudh tikuon thevnyache upay) अनेकदा आपण दिवसातून तीन ते चार वेळा दूध तापवतो. पण तरीही काही तासांतच ते खराब होते.(Dudh nasu naye mhanun kay karave) फ्रिज असेल तर ही समस्या काही प्रमाणात सुटते, पण ज्यांच्याकडे फ्रिज नाही किंवा वारंवार वीज जात असेल, अशा वेळी दूध दीर्घकाळ साठवून ठेवणे मोठे आव्हान असते. (Natural way to keep milk fresh in heat)
दूध उकळताना आपण एका खास गोष्टीचा वापर केल्यास दुधातील आम्लतेचे प्रमाण नियंत्रित राहते. तसेच ते दिवसभर फ्रेशही राहते. जाणून घेऊया उन्हाळ्यात फ्रीजशिवाय दूध ताजे ठेवण्याच्या काही खास टिप्स. (Summer food preservation hacks)

रोजचा स्वयंपाक होईल पटकन -पदार्थ होतील चविष्ट! सोप्या १० किचन टिप्स-वेळ, मेहनत दोन्ही वाचेल

आपल्याला दूध जास्त काळ ताजे आणि फ्रेश ठेवायचे असेल तर ही छोटीशी युक्ती करुन पाहा. दूध उकळताना त्यात १ चमचा साखर घाला. यामुळे दूध थोडे जास्त काळ ताजे राहिल आणि ते लवकर खराबही होणार नाही. उन्हाळ्यात दूध अधिक काळ ताजे ठेवायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. 

दूध आणल्यानंतर लगेच गरम करायला हवे.दूध उकळताना ते मध्यम आचेवर ठेवा आणि किमान ३-४ मिनिटे नीट उकळू द्या. दूध उकळल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्यानंतरच त्यावर जाळीदार झाकण ठेवा. गरम दुधावर लगेच घट्ट झाकण ठेवल्यास वाफेमुळे पाणी तयार होते आणि त्यामुळे दूध लवकर नासते.थंड झाल्यानंतरच ते फ्रीजमध्ये ठेवा. सतत दूध फ्रिजच्या बाहेर ठेवू नका. नेहमी झाकण असलेल्या स्वच्छ डब्यात किंवा पातेल्यात दूध ठेवायला हवे.

अनेकदा आपण ज्या भांड्यात दूध उकळतो, त्या भांड्याला आधीच्या दुधाचे कण चिकटलेले असतात. उन्हाळ्यात हे कण सूक्ष्म बॅक्टेरिया तयार करतात. त्यामुळे दूध उकळण्यापूर्वी भांडे साबणाने नीट घासून, स्वच्छ पाण्याने विसळून घ्यावे. शक्य असल्यास भांडे विसळल्यानंतर त्यात थोडे पाणी फिरवून मगच दूध ओतावे.

आपल्याकडे फ्रीज नसेल, तर एका मोठ्या परातीत किंवा टोपात थंड पाणी घ्या. त्या पाण्यात दुधाचे पातेले ठेवा. यामुळे पाण्याचे तापमान दुधाला थंड ठेवण्यास मदत करेल. दर ३-४ तासांनी हे पाणी बदलल्यास दूध ताजे राहते.  उन्हाळ्यात केवळ एकदा दूध उकळवून नका. सकाळी उकळवलेले दूध संध्याकाळी पुन्हा एकदा उकळवून घेतल्यास त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दूध दुसऱ्या दिवसापर्यंत ताजे राहते.

Web Title : दूध को ज़्यादा समय तक ताज़ा रखें: आसान उपाय, फ्रिज की ज़रूरत नहीं!

Web Summary : गर्मी में दूध जल्दी खराब होता है? उबालते समय चीनी डालें! दोबारा उबालें, साफ बर्तन इस्तेमाल करें। ढकने से पहले ठंडा होने दें। फ्रिज न हो तो ठंडे पानी में रखें, पानी बदलते रहें।

Web Title : Keep Milk Fresh Longer: Simple Summer Tips, No Fridge Needed!

Web Summary : Summer heat spoiling milk? Add sugar while boiling! Re-boil milk, use clean utensils. Cool properly before covering. If no fridge, submerge the container in cold water, changing it frequently.