स्वयंपाकघरात वापरलं जाणारं आलं हे भाजी, आमटी, चहा असो किंवा काढा सगळ्यांची चव वाढवतं. आल्याशिवाय पदार्थांना चव येत नाही.(how to store ginger) त्यासाठी आपल्यापैकी अनेक लोक बाजारातून आलं जास्तीच आणून ठेवतात. आलं फ्रीजमध्ये साठवून ठेवतात. पण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही काही दिवसांत आलं सडतं, काळं पडतं किंवा त्यावर बुरशी येते.(ginger storage tips) अशावेळी ते आलं फेकण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नसतो. (keep ginger fresh)
सध्या आलं खूप महाग देखील झालं आहे. अशावेळी आठवड्याभरात आलं खराब झालं तर आपली चिडचिड होते. काही लोक खराब झालेलं आलं कापून पुन्हा वापरतात, तर काही लोक संपूर्ण आलं फेकून देतात. पण बुरशी लागलेलं आलं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. महिनाभर आलं टिकवून ठेवण्यासाठी आपण काय करायला हवं जाणून घेऊया.
1. खराब झालेलं आलं साठवण्यासाठी आपल्याला आधी ते काढून टाकावं लागेल. कुजलेला भाग काढून टाकल्याने चांगले आले आपल्याला वापरता येईल. कापल्यानंतर आले स्वच्छ करणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पाण्याने धुण्याऐवजी रबिंग कापड किंवा सुती कापडाने पुसा. ज्यामुळे त्याच्यावरील घाण निघून जाण्यास मदत होईल.
2. आले प्लास्टिकच्या डब्यात साठवू नका. ते साठवण्यासाठी स्वच्छ, कोरडा डबा निवडा. या डब्याच्या तळाशी स्वयंपाकघरातील टॉवेल, टिश्यू पेपर किंवा स्वच्छ सुती कापड लावा. यामुळे आल्यातील पाणी शोषण्यास मदत होईल. यानंतर त्यावर आल्याचे तुकडे ठेवा.
3. आल्याचे तुकडे डब्यात ठेवल्यानंतर त्याचे झाकण लावू नका. त्याऐवजी वरचा भाग टिश्यू पेपर किंवा सुती कापडाने घट्ट झाका. यामुळे आल्याला थोडी हवा मिळते. ज्यामुळे कुजण्याचा धोका कमी होतो. तसेच टिश्यू पेपरमुळे बाहेर घाण आतही जात नाही.
4. आले ज्या डब्यात साठवले आहे तो डबा दर आठवड्याला तपासा. वरचा किंवा खालचा टिश्यू पेपर ओला झाला असेल तर ते ताबडतोब बदला. ओल्या टिश्यू पेपरमुळे ओलावा वाढतो, ज्यामुळे आले पुन्हा कुजते. कोरडा टिश्यू पेपर लावल्याने ते जास्त काळ टिकते.
