Join us

फ्रीजमध्ये ठेवलेली कणिक काळी पडते, कडक होते? ४ सोपे उपाय- कणिक राहिल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2025 12:23 IST

dough storage hacks: keep atta fresh in refrigerator: soft chapati dough tricks: काही सोपे घरगुती उपाय केल्यास पीठ जास्त वेळ ताजे, मऊ आणि पांढरे राहू शकते.

सध्या धावपळीच्या जगात वेळ वाचवण्यासाठी अनेक महिला आठवड्याभराची पूर्वतयारी आधीच करतात. (Cooking hacks) भाज्या चिरुन, मसाले तयार करुन ठेवतात आणि ज्याचा आठवडाभर पूरेपूर वापर करतात. आठवड्याभरात जेवणात काय करायचे याची देखील यादी त्यांनी तयार केलेली असते.(Kitchen Tips)  इतेकच नाही तर सकाळी घाईच्या वेळी कणिक मळताना फार उशीर होतो. तो वेळ वाचवण्यासाठी ते रात्रीच पूर्वतयारी करतात. अनेकदा कणिक मळून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते काळे होते किंवा अधिक कडक होते.(dough storage hacks) त्यापासून बनवलेल्या पोळ्या खराब दिसतात आणि त्याची चव देखील वेगळी लागते. पण काही सोपे घरगुती उपाय केल्यास पीठ जास्त वेळ ताजे, मऊ आणि पांढरे राहू शकते. (keep atta fresh in refrigerator)

उडीदाच्या डाळीचे खमंग वरण, गरमागरम भातासोबत खा- पाहा पारंपरिक रेसिपी, पावसाळा स्पेशल

1. जेव्हा केव्हा आपण पीठ मळून ठेवू तेव्हा त्यावर थोडे सुके पीठ किंवा तेल हाताने लावायला हवे. तेलाच्या थरामुळे कणिक कोरडे होत नाही. त्याला ऑक्सिडेशन होण्यापासून वाचवते आणि त्यामुळे पीठ काळे पडत नाही. 

2. मळलेले पीठ कधीही उघड्या डब्यात ठेवू नका. ते नेहमी फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवा. रेफ्रिजरेटरची थंड आणि कोरडी हवा पीठ कडक आणि शिळे बनवते. हवाबंद डब्यात कणिक सिल केले जाते. ज्यामुळे पीठाला ओलसरपणा येत नाही आणि ते मऊ राहते. 

3. फ्रीजमध्ये कणिक ठेवण्यापूर्वी ते किती कडक आहे हे लक्षात ठेवा. खूप मऊ असणारे पीठ फ्रीजमध्ये चिकट होते तर खूप कडक असलेले पीठ सुकते. त्यामुळे पीठ इतके कडक मळू नका की, ते हातांना न चिकटता त्याचा गोळा बनवता येईल. आणि कोरडेही पडणार नाही. 

भाजीत तेल जास्त झाले? ४ सोपे उपाय- पदार्थ बिघडणार नाही, होईल अधिक चविष्ट

4. मळलेले कणिक जास्त वेळ ठेवायचे असेल तर त्याला ॲल्युमिनियमच्या फॉइलमध्ये गुंडाळा. या फॉइलचा थर रेफ्रिजरेटच्या ओलावा आणि हवेपासून पीठाचे संरक्षण करतो. तसेच पीठाचा मऊपणा तसाच ठेवतो. 

5. कणिक हे नेहमी साठवायचे असेल तर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायला हवे. ज्यामुळे ते अधिक काळ राहते. फ्रीजमधून कणिक काढल्यानंतर ते लगेच वापरु नका. त्याला सामान्य तापमानावर येऊ द्या. हलक्या हाताने मळून घ्या आणि मगच चपाती लाटा.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.