चपाती हा भारतीय जेवणातील सगळ्यात महत्त्वाचा आणि रोजचा घटक आहे. गव्हाच्या पिठापासून तयार केली जाणारी ही साधी, हलकी आणि पचनास सोपी असणारी चपाती प्रत्येक घरात खाल्ली जाते. महाराष्ट्र, उत्तर भारत किंवा मध्य भारतात चपाती, पोळी रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग मानली जाते.(chapati soft tips) कमी तेलात किंवा तेलाविना तयार होणारी चपाती आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. पण हिवाळ्यात स्वयंपाकघरात ठरलेली समस्या एकच. चपात्या लवकर कडक होणं.(how to keep chapati soft) सकाळी लाटलेल्या आणि मऊसूत वाटणाऱ्या चपात्या काही वेळातच दगडासारख्या होतात, वातड लागतात आणि खाण्याची मजाच निघून जाते. कामावर जाणाऱ्या किंवा डबा बनवणाऱ्या महिलांना हा त्रास जास्त जाणवतो.(chapati storage tips) गरमागरम चपाती खाल्ली तर ठीक, पण थोडा वेळ झाला की ती कडक होते. अशावेळी चपात्या एवढ्या कडक का होतात? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.
थायलंडचं सिक्रेट! थाई स्टाईल पेरुचे सलाड कधी खाल्ले का? डाएटवाल्यांसाठी परफेक्ट फूड
थंडीमध्ये हवेतला कोरडेपणा वाढतो. याचा थेट परिणाम पीठ मळण्यावर आणि चपात्यांच्या ओलाव्यावर होतो. योग्य प्रमाणात पाणी न घालणं, पीठ जास्त वेळ उघडं ठेवण किंवा चपात्या योग्य पद्धतीने न साठवल्यास त्या कडक आणि वातड होतात. अशावेळी काही सोप्या ४ ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर किमान दोन दिवस तरी चपात्या कडक राहातील.
1. जर आपल्या चपात्या मऊ ठेवायच्या असतील तर पीठ मळताना थोडे तूप किंवा तेल वापरु शकता. पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करा. कोमट पाण्यामुळे पिठातील ग्लूटेन योग्य प्रकारे सक्रिय होतात. ज्यामुळे चपात्या मऊ आणि लवचिक राहतात. पाणी जास्त न घालता थोडं-थोडं घालून पीठ मळा. ते घट्ट पण मऊसर ठेवा.
2. अनेकांना पीठ मळल्यानंतर लगेच चपात्या लाटण्याची सवय असते. पीठ मळल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटे ओल्या कपड्याने किंवा झाकणाने झाकूण ठेवा. यामुळे पीठ मुरण्यास मदत होते. त्यातील ओलावा टिकून राहतो.
3. चपात्या या कायम मंद आचेवर भाजायला हव्या. फास्ट गॅसवर भाजल्यास बाहेरुन कोरड्या होतात आणि आतून कडक राहतात. जास्त वेळ चपात्या तव्यावर ठेवणं टाळा. योग्य तापमानावर भाजलेल्या चपात्या मऊ राहतात.
4. भाजलेल्या चपात्या उघडणे ठेवणे टाळा. त्या कापडी रुमालात किंवा झाकण असलेल्या डब्यात ठेवा. डब्यात ठेवताना खाली आणि वर कापड ठेवलं, तर ओलावा टिकून राहतो. जर चपात्या दोन दिवसांसाठी साठवायच्या असतील, तर त्या पूर्णपणे थंड झाल्यावरच डब्यात ठेवा. गरम चपात्या बंद डब्यात ठेवल्या, तर त्या ओलसर होऊन लवकर खराब होऊ शकतात.
