हिवाळा सुरु होण्यापूर्वी मार्केटमध्ये आपल्याला ताज्या आणि रसरसशीत मोसंबी पाहायला मिळाल्या असतील. काही पिवळ्या रंगाच्या तर काही हिरव्यागार.(how to identify ripe mosambi) सगळ्या मोसंबी दिसायला सारख्या असल्या तरी चव, गोडपणा आणि रसाळपणात खूप फरक पाहायला मिळतो.(sweet lime selection tips) काही मोसंब्या या बाहेरुन पिवळ्या पण आतून कच्च्या, तुरट चवीच्या असतात तर काही अगदी गोड, रसरशीत आणि सोलल्यानंतर लगेच रस निघतो अशा असतात. मग प्रश्न असा पडतो की नेमकी गोड मोसंबी ओळखायची कशी?(how to choose sweet and juicy mosambi)
Diwali Faral: ना जास्त तेल लागते, ना लागतो वेळ- दिवाळीसाठी घरच्याघरी करा हलकीफुलकी नमकीन मठरी
अनेकजण मोसंबी निवडताना तिचा फक्त रंग पाहतात. पिवळ्या रंगाची मोसंबी दिसली की लगेच विकत घेतात. काही जण नाकाला लावून तिचा वास देखील घेतात. अनेकदा आपण घाईत मोसंबी विकत घेतो. पण घरी आल्यानंतर आपल्याला समजत की, मोसंबी नुसतीच आंबट आहे. पण मोसंबी खरेदी करताना काही टिप्स लक्षात ठेवल्यास गोड आणि चवदार मोसंबी निवडणं अगदी सोपं होतं.
मोसंबी खरेदी करताना तिच्या देठाजवळचा भाग थोडा दाबून बघा. मऊ वाटत असेल तर ती जास्त पिकलेली असते. जर हिरवीगार मोसंबी असेल आणि तिचे वरची साल खूप कडक असेल. किंवा सालीवर डाग असतील तर ती कच्ची असते. जाड सालीची मोसंबी आंबट किंवा कमी रसाळ असते. मोसंबी निवडताना अनेकजण फक्त रंग पाहतात. पण तिचा सुगंध, वजन, साल आणि आकार नीट पाहाणं देखील महत्त्वाच आहे. पिकलेली मोसंबी हातात घेतली की थोडी जड वाटते. कारण यात भरपूर रस निघतो. तिची साल मऊ पण घट्ट असते. मोसंबी हलकी पिवळ्या रंगाची आणि डागरहित असेल तर ती पिकलेली समजावी. तिचे साल काढताना सुरीने मध्यभागी कापा. त्यानंतर बिया काढताना मधल्याभागी उजव्या आणि डाव्या बाजूने कट करा. ज्यामुळे बियावर येतील आणि चाकूच्या सहाय्याने सहज निघण्यास मदत होतील.
मोसंबी केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे. यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते. जी शरीराला ऊर्जा देते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. हिवाळ्यात सर्दी- खोकल्यापासून बचाव करण्यासाठी मोसंबीचा रस उपयोगी ठरतो. योग्यपद्धतीने निवडल्यास मोसंबी गोड निघेल.