अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ खूप जास्त वाढलेली आहे. लग्नसराई, सणवार या काळात भेसळ खूप जास्त वाढते. त्यामुळे दूध, तूप, पनीर, मिठाई, खवा असे पदार्थ खूप सांभाळून खरेदी करावे लागतात. तुपामधल्या भेसळीचं एक प्रकरण नुकतंच समोर आलं असून यामध्ये दिल्ली येथून सुमारे १५०० किलो बनावटी तूप जप्त करण्यात आलं आहे. मागच्या २५ वर्षांपासून या कंपनीतर्फे तूप बनवून ते विकलं जातं. म्हणूनच आपण विकत घेत असलेलं तूप खरोखरच विश्वासार्ह आहे ना, ते भेसळीचं तर नाही ना या गोष्टी तपासून पाहाणं खूप गरजेचं आहे (how to identify adulterated ghee?). घरच्याघरी काही चाचण्या घेतल्या तर तुपामधली भेसळ नक्कीच ओळखता येते. त्यासाठी काय करायचं ते पाहूया..(difference between spurious ghee and pure ghee)
तुपामधली भेसळ कशी ओळखायची?
१. थोडंसं तूप तळहातावर घ्या आणि दोन्ही तळहात एकमेकांवर चोळा. जर हातांच्या उष्णतेमुळे तूप वितळून गेलं तर ते शुद्ध आहे. पण जर काही तूप विरघळलं आणि तुपाचे काही दाणे तुमच्या हातावर बराच वेळ तसेच राहीले तर ते तूप मात्र भेसळीचं असू शकतं.
१ आठवड्यात चेहऱ्यावर येईल ग्लो! 'या' पद्धतीने तांदळाचं पीठ वापरा, बघा कसा उजळेल चेहरा...
२. अर्धा चमचा तुपामध्ये २ ते ३ थेंब आयोडिन घाला. जर तुपाचा रंग निळसर झाला तर त्यामध्ये स्टार्च आहे हे लक्षात घ्या.
३. एक ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यावर तुपाचे काही थेंब घाला. जर तूप पाण्यावर तरंगलं तर ते शुद्ध आहे. जर त्याची गोळी बनून ते अगदी चटकन ग्लासच्या तळाला गेलं तर ते भेसळीचं असू शकतं.
४. जेवढं तूप घेतलेलं असेल तेवढंच त्यामध्ये कॉन्संट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड घाला. ५ ते ७ मिनिटांनंतर जर तुपाला लालसर रंग आला असेल तर ते तूप भेसळीचं आहे.
रोपं धड वाढतही नाहीत- त्यांना फुलंही येत नाहीत? घ्या घरगुती उपाय- वाढतील जोमात, होतील हिरवीगार
५. एका पांढऱ्या कागदाला तूप लावून ठेवा. जर तुपात भेसळ असेल तर साधारण दोन तासांनी तुम्हाला पांढऱ्या कागदावर काही पांढरट दाणेदार घटक दिसतील.
६. शुद्ध तूप हे सोनेरी पिवळ्या रंगाचं असतं. शुद्ध तूप रवाळ असून त्याला हलकासा सुगंध येतो. हा सुगंध बनावटी तुपाला नसतो.
