मागच्या काही वर्षांपासून मखाना प्रचंड लोकप्रिय असून त्याची मागणीही खूप वाढते आहे. कारण मखाना खाऊन मिळणारे शारिरीक फायदे आता कित्येकांना माहिती आहेत. मखान्यांमधून कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, प्रोटीन्स, फायबर, ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळतात. शिवाय ते उपवासालाही चालतात आणि त्याच्या कित्येक वेगवेगळ्या चवदार रेसिपी करता येतात. त्यामुळे सुपरफूड असणारे मखाना सध्या खूप लोकप्रिय आहेत. हल्ली तर असं झालंय की कोणत्याही पदार्थाची मागणी वाढली की त्याचा पुरवठा करण्यासाठी त्यात भेसळ केली जाते. तेच मखान्यांच्या बाबतीत झालं असून त्यातही भेसळ केली जात आहे. म्हणूनच खरे मखाना आणि भेसळीचे मखाना यांच्यातला फरक ओळखू यायला हवा.(How To Identify Real Makhana and Fake Makhana?)
मखान्यांमधली भेसळ कशी ओळखायची?
शुद्ध मखाने आणि भेसळीचे मखाने कसे ओळखायचे याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ anchor.sheenam.sharma या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
मुलांना डब्यात करून द्या चिली गार्लिक लच्छा पराठा! मुलं १ ऐवजी २ पराठे फस्त करतील..
१. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की शुद्ध मखाना ओळखण्याची सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे त्यांचा सुगंध घ्या. जर त्यांचा सुगंध उत्तम आला त्यात कुठला हलकासा जरी कुबट वास जाणवला नाही तर ते मखाना चांगले आहेत. नकली मखान्यांना केमिकल्सचा अगदी हलका दुर्गंध असतो.
२. मखाना घेऊन ते हातानेच तोडून पाहा. जे मखाना असली असतात ते अगदी आतून मऊ दिसतात आणि त्यांचा रंग हलकासा पिवळसर किंवा ऑफव्हाईट प्रकारातला दिसतो.
केळी खाण्याचे 'हे' फायदे माहिती आहेत का? महागडे एनर्जी ड्रिंक आणि सप्लिमेंट्सची गरजच नाही
३. नकली मखान्यांना खूप जास्त चमक असते आणि ते पांढऱ्या शुभ्र रंगाचे असतात. ते दिसायला एवढे आकर्षक असतत की बघताक्षणीच घ्यावे वाटतात. त्याउलट जे खरेखुरे शुद्ध मखाना आहेत त्यांच्यावर थोडी पिवळसर झाक असते. बाजारात मिळणारे नकली मखाना खाल्ल्याने पोट दुखणे, कॉन्स्टीपेशन, गॅसेस असे त्रास होतात. त्यामुळे ते शुद्ध असतील याची खात्री करूनच खरेदी करा. शिवाय मखाना कधीही रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडून घेऊ नका. चांगल्या दुकानातूनच मखाना खरेदी करा.
