Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > गोल की लांबट कोणता लिंबू जास्त रसाळ असतो? ६ टिप्स-चटकन ओळखा रसरशीत लिंबू

गोल की लांबट कोणता लिंबू जास्त रसाळ असतो? ६ टिप्स-चटकन ओळखा रसरशीत लिंबू

Juicy lemon selection hacks: Lemon buying guide for summer: बाजारातून लिंबू खरेदी करताना या सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवा ज्यामुळे आपले पैसे वसूल होतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2026 16:44 IST2026-03-09T18:00:00+5:302026-03-10T16:44:35+5:30

Juicy lemon selection hacks: Lemon buying guide for summer: बाजारातून लिंबू खरेदी करताना या सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवा ज्यामुळे आपले पैसे वसूल होतील.

How to identify juicy lemons Round vs Oval Lemons Rasarshit limbu kase olkhave Limbu kharedi karnyachya tips Tips to buy fresh and juicy lemons How to pick the best lemons in summer | गोल की लांबट कोणता लिंबू जास्त रसाळ असतो? ६ टिप्स-चटकन ओळखा रसरशीत लिंबू

गोल की लांबट कोणता लिंबू जास्त रसाळ असतो? ६ टिप्स-चटकन ओळखा रसरशीत लिंबू

कडाक्याचं ऊन आणि पोटात काहीतरी थंडगार जावं असं प्रत्येकाला वाटतं. अंगाची लाहीलाही होत असताना एक ग्लास थंडगार लिंबू सरबत शरारीला आणि मनाला जो थंडावा देते, त्याची सर कशातच नाही.(Juicy lemon selection hacks) लिंबू हा केवळ चवीसाठीच नाही तर व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत असल्याने उन्हाळ्यात आरोग्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. सध्या बाजारात लिंबाचे भाव देखील वाढताना पाहायला मिळतं आहे. (Lemon buying guide for summer)अशावेळी आपण पैसे देऊनही जर लिंबी कोरडे किंवा रस निघाले, तर मोठी फसगत होते. (Best lemon for lemonade)
बऱ्याचदा आपण फक्त लिंबाचा आकार बघून तो खरेदी करतो. बाजारात दोन प्रकारचे लिंबू दिसतात. एक म्हणजे पूर्णपणे गोल आणि दुसरे थोडे लांबट आकाराचे.(Limbu kharedi karnyachya tips) अनेकांना असे वाटते की मोठे किंवा लांबट लिंबू जास्त रसाळ असतात. पण लिंबू खरेदी करताना फक्त त्याचा आकार महत्त्वाचा नसून, त्याची साल, त्याचा रंग आणि त्याचा पोत या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. जर आपल्यालाही भरपूर रस असलेले लिंबू कसे ओळखायचे हे माहीत नसेल, तर बाजारातून लिंबू खरेदी करताना या सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवा ज्यामुळे आपले पैसे वसूल होतील. 

उन्हाळ्यासाठी खास लाईटवेट फॅब्रिक्स कपड्यांचे ५ सुंदर पॅटर्न, दिवसभर घामाची चिंता नको- परफेक्ट समर डेलीवेअर

1. रसरशीत लिंबू ओळखण्याची सर्वात सोपी ट्रिक म्हणजे त्याची साल. ज्या लिंबाची साल अतिशय पातळ असते, त्यात रसाचे प्रमाण नेहमी जास्त असते. ज्या लिंबाची साल जड आणि खडबडीत असते. त्यात रसापेक्षा सालीचाच भाग जास्त असतो. ज्यामुळे लिंबू आतून कोरडे निघण्याची शक्यता असते. त्यामुळे निवडताना नेहमी गुळगुळीत सालीचे लिंबू निवडा. 

2. गोल असणारे लिंबू लांबट असणाऱ्या लिंबापेक्षा अधिक रसाळ असण्याची शक्यता असते. गोल लिंबू आतून पूर्णपणे पिकलेले असतात. तर लांबट असणारे लिंबू कच्चे असतात. 

3. लिंब हातात घेतल्यानंतर ते हलके दाबून पाहा. जर लिंबू दाबल्यानंतर थोडे मऊ लागत असतील. तर त्यात भरपूर रस असेल. जर लिंब दगडासारखे कडक लागत असतील तर त्यात रस कमी असतो आणि त्यातील रस काढताना अधिक कष्ट करावे लागतात. 

4. लिंबाचा रंग गडद पिवळा असावा. पिवळसर रंगाचे लिंबू पूर्ण पिकलेले असतात. यात आंबटपणा व रस दोन्ही योग्य प्रमाणात असतात. लिंबू खूप हिरवे असतील तर ते कच्चे असू शकतात. त्याची चव देखील कडवट लागते. लिंबावर डाग नसतील याची काळजी घ्या. 

कोकणी मेजवानी! कोवळ्या फणसाचा झणझणीत 'सुका मसाला', सोपी रेसिपी- एकदा खाल्लं तर बोटं चाटत राहाल

5. दोन सारख्या आकाराचे लिंबू हातात घ्या. ज्या लिंबाचे वजन दुसऱ्यापेक्षा जास्त वाटेल, त्यात रसाचे प्रमाण जास्त असते. रसाळ लिंबू वजनाला जड असते, कारण यात द्रव पदार्थ अधिक असतो.

6. लिंबू कापण्यापूर्वी ते जमिनीवर किंवा ओट्यावर ठेवून हाताच्या तळव्याने थोडे जोरात घासून घ्या. यामुळे लिंबातील तंतू मोकळे होतात आणि रस काढणं सोपे जाते. तसेच, लिंबू काही सेकंद कोमट पाण्यात ठेवल्यास त्यातून अधिक रस बाहेर येतो.
 

Web Title : रसीले नींबू की पहचान: सबसे स्वादिष्ट नींबू चुनने के आसान उपाय

Web Summary : गर्मी को मात दें रसीले नींबू से! पतली, चिकनी त्वचा, गहरे पीले रंग और भारी महसूस होने वाले नींबू चुनें। नरम नींबू अधिक रस देते हैं। काटने से पहले रोल करें। ताज़ा नींबू पानी का आनंद लें!

Web Title : Juicy Lemon Guide: Tips to Pick the Most Succulent Lemons

Web Summary : Beat the heat with juicy lemons! Choose lemons with thin, smooth skin, a deep yellow color, and a weightier feel. Softer lemons yield more juice. Roll before cutting for maximum extraction. Enjoy refreshing lemonade!