Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिंगातली भेसळ ओळखा १ मिनिटांत, हिंगाचा गंध असलेला भुसा तुम्ही स्वयंपाकात वापरताय-तपासा चटकन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2025 15:28 IST

How to identify pure hing: Pure hing test at home: Fake hing vs pure hing: काही सोप्या घरगुती टिप्स वापरुन आपण मिनिटांत हिंगाची शुद्धता ओळखू शकतो.

स्वयंपाकघरात हिंगाची फोडणी दिली की डाळ, आमटी किंवा भाजीची चव एकदम टेस्टी लागते. चिमुटभर हिंग आपल्याला पदार्थाटी चव वाढवतो. टेस्ट आणि सुगंधासाठी हिंग भाज्यांमध्ये टाकला जातो. पण सध्या बाजारात बनवाट हिंगसुद्धा मिळू लागला आहे.(How to identify pure hing) अनेक गृहिणींची तक्रार असते की हिंग घातला तरी चव येत नाही, पावडर जास्त लागते. यामागाचं सगळ्यात मोठ आणि मु्ख्य कारण भेसळयुक्त हिंग. खरे हिंग हे फार कमी प्रमाणात लागतो.(Pure hing test at home) पण नकली हिंगामुळे चव, वास आणि आरोग्यावर परिणाम होतो. अनेकदा स्वयंपाकघरात हिंग घातल तरी आमटी, डाळ किंवा भाजीची चव खुलत नाहीये? वरुन हिंग जास्त घालावा लागतो, तरीही स्वाद येत नाही? कारण आजकाल बाजारात मिळणारा हिंग भेसळयुक्त असतो.(Fake hing vs pure hing) काही सोप्या घरगुती टिप्स वापरुन आपण मिनिटांत हिंगाची शुद्धता ओळखू शकतो. 

कमी साय पण तूप वाटीभर, फ्रीजमध्ये साय साठवण्याची अनोखी पद्धत- ३ चुका टाळा, तूप होईल भरपूर

1. हिंग खरेदी करताना आपल्याला त्याच्या रंगांकडे लक्ष द्यावे लागेल. खरा हिंग हा हलक्या तपकिरी रंगाचा असतो. तेलात टाकल्यानंतर किंवा भाजल्यानंतर तो लाल होतो. तर बनावट हिंग आपला रंग बदलत नाही. 

2. आपण खऱ्या आणि बनावट हिंगाच्या वासावरुन फरक ओळखू शकता. खऱ्या हिंगाचा वास खूप तीव्र असतो. त्याचा वास बराच काळ टिकतो. तर बनावट हिंगाचा वास कमी येतो. 

3. शुद्ध हिंग चिमूटभर पुरेसे असते. जर आपल्याला अर्धा चमचा किंवा त्याहून जास्त हिंग घालावा लागत असेल तर तो हिंग नक्कीच भेसळयुक्त आहे. बहुतेक वेळा अशा हिंगात मैदा, तांदळाची पावडर किंवा स्टार्च मिसळलेला असतो.

4. आपण थोडासा हिंग कोमट पाण्यात टाकू शकतो. शुद्ध हिंग पटकन विरघळतो आणि त्याचा वास ही तीव्र येतो. भेसळयुक्त हिंगात मात्र गुठळ्या पडतात किंवा पाणी फारसं बदलत नाही.

5.खरा हिंग हा हलका पिवळसर, मळकट किंवा किंचित तपकिरी असतो. फारच पांढरा, अगदी बारीक आणि कोरडा पावडरी हिंग बहुतेक वेळा नकली असतो. शुद्ध हिंग थोडासा चिकट वाटू शकतो.

6. हिंगाला चव, सुगंध येत नसेल किंवा जास्त पावडर लागत असेल तर तो बदला. योग्य हिंग निवडला तर पदार्थांची चव खुलते. आणि पदार्थ खऱ्या अर्थाने स्वादिष्ट होतात.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Detect Adulterated Asafoetida in a Minute: Quick Purity Tests

Web Summary : Worried about fake asafoetida? Use these simple home tests to check for purity by color, smell, and solubility. Ensure authentic flavor and health benefits.
टॅग्स :अन्नकिचन टिप्स