Join us

गोड-रसाळ खरबूज ओळखण्याची एक खास ट्रिक सांगतात शेफ पंकजा, खरबूज निघेल मस्त गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2025 19:34 IST

how to choose sweet muskmelon: ripe muskmelon selection tips: how to identify a ripe melon: muskmelon buying guide: बाजारात खरबूज खरेदी करायला गेलात तर ते फळ गोड रसाळ आहे की, नाही हे ओळखायचे कसे?

उन्हाळ्यात बाजारात आपल्याला आंबा, कलिंगडसोबत पाहायला मिळत ते खरबूज. बाहेरून कडक पण आतून रसरशीत असणारं हे फळं शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.(how to check if muskmelon is sweet and ripe) या फळांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. शरीरातील वाढलेले तापमान नियंत्रण ठेवण्याचे काम हे फळ करते. खरबूज खाल्ल्याने शरीराला गारवा मिळत नाही तर अनेक पोषक तत्व देखील मिळतात.(chef tips for selecting muskmelon) या फळामध्ये व्हिटॅमीन सी आणि अँटीऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशन, बद्धकोष्ठता आणि सतत लघवीचा त्रास होत असेल तर खरबूज खाणे फायदेशीर ठरते.(signs of sweet ripe melon fruit) उन्हाळा सुरु झाला की, बाजारात अनेक प्रकारची फळे पाहायला मिळतात.(best way to pick juicy muskmelon) फळ लवकर पिकावी म्हणून यावर केमिकलचा मारा केला जातो. परंतु, यामुळे फळ बाहेरुन जरी पिकलेली वाटतं असली तरी आतून मात्र त्याची चव बदलेली असते.(summer fruit shopping guide muskmelon) फळ नेमकी ओळखायची कशी हे माहित नसल्याने आपण पैसे देऊन ती विकत घेतो. घरी आणून फळ आतून कच्चे असल्याचे समजते.(muskmelon ripeness test) पांढऱ्या रंगाचे कडक फळ असेल तर ते खायला गोड लागत नाहीच त्यामुळे पैसे देखील वाया जातात. बाजारात खरबूज खरेदी करायला गेलात तर ते फळ गोड रसाळ आहे की, नाही हे ओळखायचे कसे यासाठी शेफ पंकजाने काही सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत. (sweet fruit aroma test)

पारंपरिक पद्धतीचं आंबट-गोड कैरीचं लोणचं! ५ टिप्स- वर्षभर टिकेल, बुरशीही लागणार नाही...

1. खरबूज खरेदी करताना त्याचा वास घ्या. जर आपल्याला त्याचा वास येत असेल तर समजावे ते चांगले पिकलेले आहे. ते आतून गोड आणि रसाळ असेल. 

2. खरबूज हलके दाबून पाहा. ते किती मऊ आहे हे तपासा. जर ते आतून मऊ वाटत असेल तर ते चांगले पिकलेले आहे. परंतु, ते जास्त प्रमाणात मऊ नसायला हवे. जास्त मऊ असेल तर ते खूप पिकलेले असेल, ज्यामुळे ते लवकर खराब होईल. असे खरबूज खरेदी करणे टाळावे. ते आतून कुजलेले किंवा खराब असतो. 

3. खरबूजाच्या सालीवर जाळीचे डाग असतात. सालीवर सोनेरी रंगाच्या जाळ्या असतात. असे खरबूज चांगले, ताजे, गोड आणि पिकलेले असते. जर खरबूज हिरवा असेल तर याचा अर्थ की तो नीट पिकलेला नाही. तो गोड असण्याची शक्यता देखील कमी असते. पण खरबूज सोनेरी किंवा पिवळा झाला असेल तर ते चांगले पिकले आहे असे समजा. 

4. खरबूज खरेदी करताना हाताला पांढरा रंग लागला तर समजावे ते केमिकलने किंवा लिंबाच्या मदतीने पिकवले आहे. असे खरबूज विकत घेऊ नका. चुना किंवा इतर रसायने वापरुन खरबूज पिकवले जाते. जे आरोग्यासाठी हानिकारक असते.  

टॅग्स :अन्नपाककृती