आपल्यापैकी बहुकतेक सगळ्यांच्याच घरी दररोज दूध विकत आणले जातेच. घरच्याघरीच उकळलेल्या दुधावर जाड, मलईदार साय यावी अशी अनेक गृहिणींची इच्छा असते. चहा-कॉफीपासून ते गोड पदार्थांपर्यंत साय असलेले दूध अधिक चविष्ट लागते. मात्र अनेकदा दूध उकळूनही त्यावर पातळ साय येते किंवा साय नीट जमतच नाही. दूध तापवल्यानंतर त्यावर आलेली 'जाड साय' पाहून मनाला मिळणारे समाधान काही वेगळेच असते. घरच्याघरीच साजूक तूप तयार करायचे असेल किंवा बासुंदीसारखे पदार्थ, तर घट्ट साय येणे अत्यंत गरजेचे असते. अनेक गृहिणींची तक्रार असते की, दूध कितीही महागडे आणले तरी त्यावर डेअरीसारखी जाड साय येत नाही(how to get thick malai from watery milk).
दुधापासून लोणी आणि तूप बनवण्यासाठी दुधावर घट्ट साय येणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा आपण दूध उकळतो आणि लगेच फ्रिजमध्ये ठेवतो, पण तरीही साय पातळच येते. खरंतर, दुधावर जाडसर साय येण्यासाठी, दूध उकळण्याची पद्धत, भांडे, उष्णतेचे योग्य प्रमाण आणि दूध थंड करण्याची पद्धत या सगळ्या लहान - सहान गोष्टींकडे विशेष (desi trick for thick malai on milk) लक्ष देणे गरजेचे असते. दुधावर जाडसर, दाट साय येण्यासाठी नेमकं काय करावं याच्या काही खास टिप्स पाहूयात(get thick malai without full cream milk).
दुधावर जाडसर, दाट, घट्ट साय येण्यासाठी काय करावं?
१. भांड्याच्या कडेला साजूक तूप लावा :- सर्वात आधी तुम्ही ज्या भांड्यात दूध उकळणार आहात, त्याच्या कडांना थोडेसे साजूक तूप लावा. यामुळे दूध उतू जाणार नाही आणि दुधावर साय देखील खूप छान येईल. दुधावर जाडसर, दाट, घट्ट साय येण्यासाठी हा उपाय अतिशय फायदेशीर ठरतो.
२. तांदळाच्या दाण्यांचा उपाय :- दुधावर जाड साय येण्यासाठी हा एक उपाय फायदेशीर ठरतो. दूध गरम करताना त्यात थोडेसे कच्चे तांदूळ टाका. तांदूळ जास्त न घेता अगदी थोडेच घ्यावेत. ही ट्रिक वापरून तुम्ही पाहू शकता की दुधावर घट्ट, दाटसर आणि जाड साय येते.
वाटीभर दलियाचा करा मस्त कुरकुरीत डोसा-वजनही घटेल आणि खाऊन पोटही भरेल आनंदाने-पाहा रेसिपी...
३. उकळी आल्यावर गॅसची फ्लेम कमी करा :- दूध उकळून बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. दुधाला उकळी येताच गॅसची फ्लेम अगदी मंद करा. त्यानंतर तुम्ही गॅस बंद करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार दूध थोडा वेळ मंद आचेवर आटू देऊ शकता, यामुळे दुधावर घट्ट, दाटसर आणि जाड साय येते.
४. दूध झाकून थंड करा :- दूध उकळल्यानंतर त्याला लगेच हलवू नका. भांड्यावर एखादी जाळी किंवा चाळणी ठेवून दूध पूर्णपणे थंड होऊ द्या. लक्षात ठेवा, गरम दूध लगेच फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यावर साय नीट जमणार नाही.
५. फ्रिजमध्ये ठेवून साय काढा :- दूध पूर्णपणे थंड झाल्यावर ते कमीत कमी ३ ते ४ तास फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवा. त्यानंतर चाकू किंवा चमच्याच्या मदतीने कडा सोडून तुम्ही जाड साय बाहेर काढू शकता.
६. दूध ढवळू नका :- उकळताना किंवा उकळी आल्यानंतर दूध वारंवार ढवळल्यास साय फुटते. साय जमण्यासाठी दूध न ढवळणं फार महत्त्वाचं आहे.
