दूध उकळल्यानंतर वर जाड, दाटसर साय यावी असं अनेकांना वाटतं, कारण अशा सायीपासून तूप, लोणी, श्रीखंड किंवा घरगुती मिठाई असे अनेक पदार्थ तयार करता येतात. पण अनेक वेळा दूध उकळूनही त्यावर पातळ सायच येते किंवा अजिबात साय जमा होत नाही. स्वयंपाकघरात दुधाला उकळी फुटली की घरभर त्याचा जो सुवास दरवळतो, तो मनाला सुखावणारा असतो. पण गृहिणींची खरी कसरत असते ती म्हणजे त्या दुधावर घट्ट आणि जाड साय आणणे. आपण कितीही 'फुल क्रीम' दूध विकत आणले तरी अनेकदा त्यावर हवी तशी जाड साय येत नाही. दुधावर जाड साय येण्यासाठी फक्त दूध उकळवणेच पुरेसे नसते, तर दुधाचे भांडे, दुधाचे तापमान आणि साठवण्याची पद्धत हे छोटे-छोटे पण महत्त्वाचे घटक कारणीभूत असतात(milk boiling tips for malai).
खरंतर, फक्त एक सोपी किचन ट्रिक (thick malai on milk tips) वापरली तर दुधावर अगदी भाकरीसारखी जाड, दाटसर साय सहज तयार होऊ शकते. ही पद्धत पूर्णपणे घरगुती असून त्यासाठी कोणत्याही अतिरिक्त साहित्याची गरज नसते. योग्य प्रकारे दूध उकळणे आणि थंड होऊ देण्याची योग्य पद्धत समजून घेतली तर रोजच्या दुधावर भरपूर साय जमा होऊ शकते. दुधावर साय येण्यासाठी, काही पारंपारिक आणि सोप्या ट्रिक्स (how to get thick malai on milk) पाहूयात ज्या वापरल्यानंतर दुधावर घट्ट आणि दुपटीने जाडसर साय येऊ शकते.
दुधावर भरपूर साय जमा होण्यासाठी खास ट्रिक्स...
१. सर्वातआधी गॅसच्या मोठ्या आचेवर दूध उकळा :- साय जमवण्याच्या प्रक्रियेची सुरुवात दुधाच्या योग्य तापमानापासून होते. दूध एका जड पृष्ठभागाच्या भांड्यात काढून घ्या आणि ते गॅसच्या मोठ्या आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. मोठ्या आचेवर दूध लवकर गरम होते आणि त्यातील फॅट्स अॅक्टिव्ह होऊ लागतात. या दरम्यान दूध मधून-मधून चमच्याने ढवळत राहा, जेणेकरून ते भांड्याच्या तळाला चिकटणार नाही.
२. दुधावर हलकी साय दिसेपर्यंत वाट पाहा :- दुधाच्या पृष्ठभागावर हलकी साय किंवा फेसाळलेला थर दिसेपर्यंत दूध मोठ्या आचेवर गरम करत राहा. जशी दुधाच्या वरच्या थरावर साय दिसायला लागेल, तेव्हा समजून जा की साय जमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दरम्यान थोडी काळजी घ्या, जेणेकरून दूध उकळून भांड्याबाहेर सांडणार नाही.
३. गॅसची आच कमी करा :- दुधाला पहिली उकळी येऊ लागताच किंवा वरचा थर दिसू लागताच, गॅसची आच लगेच कमी करा. साय जमण्याची खरी प्रक्रिया इथूनच सुरू होते. मंद आचेवर दूध आणखी काही वेळ गरम करून घ्या. यामुळे दुधातील अतिरिक्त पाणी वाफ होऊन उडून जाते आणि फॅट्सचा थर घट्ट होऊ लागतो.
४. जाड साय येण्यासाठी वाट पाहा :- दुधावर सायीचा एक जाड थर दिसेपर्यंत दूध मंद आचेवरच ठेवा. या दरम्यान दुधात पळी किंवा चमचा अजिबात घालू नका, नाहीतर सायीचा थर तुटेल आणि साय नीट जमणार नाही. जेव्हा तुम्हाला वाटेल की सायीचा थर बऱ्यापैकी घट्ट आणि सोनेरी रंगाचा दिसू लागला आहे, तेव्हा गॅस बंद करा.
५. दूध व्यवस्थित थंड करून घ्या :- गॅस बंद केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध रुम टेम्परेचरला नैसर्गिकरीत्या थंड होऊ देणे. गरम दूध कधीही थेट फ्रिजमध्ये ठेवू नका. भांड्यावर जाळीदार झाकण ठेवा जेणेकरून वाफ बाहेर जाऊ शकेल. जर तुम्ही दूध पूर्णपणे डिश ठेवून झाकले, तर वाफेमुळे पाण्याचे थेंब सायीवर पडतील आणि ती पातळ होईल.
६. रात्रभर फ्रिजमध्ये ठेवणे :- जेव्हा दूध पूर्णपणे थंड होईल, तेव्हा ते काळजीपूर्वक ते रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजमधील थंडावा सायीच्या थराला अधिक घट्ट, दाटसर आणि स्थिर करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही साय काढाल, तेव्हा ती एखाद्या भाकरीसारखीच घट्ट आणि जाड निघेल.
Web Summary : Want thick cream on your milk? Use this simple kitchen trick! Boil on high, then simmer. Cool completely, refrigerate overnight. Enjoy a rich, creamy layer.
Web Summary : दूध पर मोटी मलाई चाहते हैं? इस आसान किचन ट्रिक का इस्तेमाल करें! तेज आंच पर उबालें, फिर धीमी आंच पर पकाएं। पूरी तरह से ठंडा करें, रात भर फ्रिज में रखें। मोटी मलाई का आनंद लें।