आपल्यापैकी अनेकांच्या घरात भेंडी आवडीने खाल्ली जाते. किमान आठवड्यातून दोन दिवस तरी भेंडीची भाजी ताटात असते.(crispy masala bhindi recipe) पण घरात असेही काही मंडळी असतात ज्यांना भेंडी म्हटलं की अनेकजण नाक मुरडतात.(how to make non sticky bhindi) भेंडी बनवताना ती चिकट होते, गिळगिळीत लागते. ज्यामुळे तिची चव देखील बिघडते. किती वेळा धुतली, कापताना पुसून घेतली किंवा वेगवेगळ्या पद्धतीने शिजवली तरी भेंडीला चिकटपणा येतो.(bhindi fry recipe in 10 minutes) त्यामुळे अनेकजण भेंडीची भाजी खाणे टाळतात. अनेकजण कांदा-टोमॅटो घालून ही भाजी बनवतात.(okra fry Indian style) काही जण नुसती तव्यावर परतवून बनवतात. काही बेसनाचे पीठ पेरुन तर काही जण आल्या-लसणाची पेस्ट घालून भाजी करतात.(dry bhindi masala recipe) दही भेंडी, मसाला भेंडी, भेंडी तडका, भेंडी फ्राय यांसारख्या विविध पदार्थांची चव चाखली असेल. पण तरी देखील खाताना भेंडी मिळमिळतीच लागते. (bhindi recipe for lunch or dinner)अनेकदा कुरकुरीत भेंडी करताना ती नीट फ्राय झाली नाही, मसाला योग्य प्रमाणात लागला नाही किंवा ती नीट कुरकुरीत झाली नाही तर चव बिघडते. (easy bhindi sabzi recipe) पण काही सोप्या पद्धतीने अवघ्या १० मिनिटांत आपण मसाला कुरकुरीत भेंडी नक्की ट्राय करु शकतो. पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
फरसबी-बटाटा मसाला फ्राय, हॉटेलात मिळणाऱ्या तवा फ्रायपेक्षा भारी- फरसबी न आवडणारेही खातील चाटूनपुसून
साहित्य
भेंडी - १० ते १२बेसनाचे पीठ - ४ चमचे तांदळाचे पीठ - २ चमचे हळद पावडर - १ चमचा आमचूर पावडर - अर्धा चमचा लाल मिरची पावडर - १ चमचा मीठ - चवीनुसार मॅगी मसाला - १ पॅकेट पाणी - आवश्यकतेनुसार तेल - तळण्यासाठी
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यावी लागेल. यानंतर आपल्याला भेंडीला मध्यभागी उभ्या आकारात चिरुन घ्यावे लागेल. लक्षात ठेवा भेंडीला देठापासून टोकापर्यंत अर्धी चिरा.
2. आता एका बाऊलमध्ये बेसनाचे पीठ, तांदळाचे पीठ, हळद , आमचूर पावडर, लाल मिरची पावडर, मीठ, मॅगी मसाला घाला. वरुन पाणी घालून बॅटर तयार करा. या बॅटकमध्ये चिरलेली भेंडी घाला.
3. गॅसवर तेल गरम करुन घ्या. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर भेंडी मंद आचेवर तळून घ्या. दहीसोबत खा कुरकुरीत मसाला भेंडी.
Web Summary : Tired of slimy okra? This recipe creates crispy, flavorful bhindi in minutes. Enjoy this simple method for a delicious side dish.
Web Summary : चिपचिपी भिंडी से परेशान हैं? यह रेसिपी मिनटों में कुरकुरी, स्वादिष्ट भिंडी बनाती है। एक स्वादिष्ट साइड डिश के लिए इस सरल विधि का आनंद लें।