Lokmat Sakhi >Food > ताजी रसरशीत स्ट्रॉबेरी धुण्याची सोपी ट्रिक, ‘अशी’ ठेवा स्ट्रॉबेरी-आठवडभर राहील ताजी

ताजी रसरशीत स्ट्रॉबेरी धुण्याची सोपी ट्रिक, ‘अशी’ ठेवा स्ट्रॉबेरी-आठवडभर राहील ताजी

How to Clean Strawberries : How to Clean Strawberries So They Last Longer : Best Ways to Wash Fresh Strawberries : How to Clean Strawberries Properly : यंदाच्या सिझनमध्ये स्ट्रॉबेरी भरपूर खा, पण त्या आधी ती नेमकी कशी धुवायची ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2024 18:14 IST2024-12-19T18:54:10+5:302024-12-20T18:14:15+5:30

How to Clean Strawberries : How to Clean Strawberries So They Last Longer : Best Ways to Wash Fresh Strawberries : How to Clean Strawberries Properly : यंदाच्या सिझनमध्ये स्ट्रॉबेरी भरपूर खा, पण त्या आधी ती नेमकी कशी धुवायची ते पाहा...

How to Clean Strawberries Properly How to Clean Strawberries So They Last Longer Best Ways to Wash Fresh Strawberries How to Clean Strawberries | ताजी रसरशीत स्ट्रॉबेरी धुण्याची सोपी ट्रिक, ‘अशी’ ठेवा स्ट्रॉबेरी-आठवडभर राहील ताजी

ताजी रसरशीत स्ट्रॉबेरी धुण्याची सोपी ट्रिक, ‘अशी’ ठेवा स्ट्रॉबेरी-आठवडभर राहील ताजी

हिवाळ्याच्या दिवसांत बाजारांत फळे व भाज्या अतिशय ताज्या आणि फ्रेश (How to Clean Strawberries) विकत मिळतात. थंडीच्या दिवसांत बाजारांत (How to Clean Strawberries So They Last Longer) विकायला ठेवलेलं लालचुटुक इवलेसे फळं म्हणजे स्ट्रॉबेरी. आंबट - गोड चवीचे, दिसायला सुंदर असे हे फळं तितकेच नाजूक असते. बाजारांतून कोणतंही फळं आणल की ते आधी स्वच्छ धुवायच आणि मगच खायचं हा नियम सगळ्यांच घरात पाळला जातो. परंतु स्ट्रॉबेरी सारखे(Best Ways to Wash Fresh Strawberries) नाजूक फळं स्वच्छ करणे म्हणजे कठीण काम. इतर फळं धुण्यापेक्षा स्ट्रॉबेरी धुण्याची पद्धतही थोडी वेगळी आहे(How to Clean Strawberries Properly). 

हल्ली कोणतीही फळं पिकविण्यासाठी त्यावर खूप जास्त प्रमाणात किटकनाशकांचा, वेगवेगळ्या रसायनांचा वापर केला जातो. स्ट्रॉबेरीही त्याला अपवाद नाही. स्ट्रॉबेरीला जी बाहेरून लहान- लहान छिद्रे दिसतात, त्यात बऱ्याचदा छोटे- छोटे किडे असतात. जर स्ट्रॉबेरी नुसतीच वरवर धुतली तर ते किडे निघत नाहीत. सोबतच या लहान छिद्रांमध्ये काहीवेळा धूळ, माती अडकून बसते. त्यामुळे स्ट्रॉबेरी कशा पद्धतीने स्वच्छ करावी, याविषयीचा एक छोटासा व्हिडिओ saltinall या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. सोबतच स्ट्रॉबेरी हे फळं नाशवंत आहे ते लगेच २ ते ३ दिवसांत खाऊन संपवले नाही तर लगेच खराब होते. अशावेळी खराब झालेली महागामोलाची स्ट्रॉबेरी फेकून देणे जिव्हारी लागते. यासाठीच स्ट्रॉबेरी कशी स्वच्छ करावी आणि आठवडाभर खराब न होता चांगली टिकवून ठेवण्यासाठी कशी स्टोअर करावी ते पाहूयात.

स्ट्रॉबेरी धुण्याची नवी पद्धत कोणती ? 

१. या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या माहितीनुसार स्ट्रॉबेरी धुण्यासाठी आपल्याला बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि पाणी या तीन गोष्टी लागणार आहेत.

२. सगळ्यात आधी बाजारातून आणलेल्या स्ट्रॉबेरी एका भांड्यामध्ये काढून घ्या. आता या स्ट्रॉबेरीवर १ टेबसलस्पून बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि सगळ्या स्ट्रॉबेरी पुर्णपणे बुडतील एवढं पाणी घाला. त्यानंतर या मिश्रणात या स्ट्रॉबेरी १० ते १५ मिनिटे तशाच ठेवून द्याव्यात. त्यात जर काही किडे असतील तर ते बाहेर येतील. प्रत्येकवेळी अशा पद्धतीने स्ट्रॉबेरी धुतल्यावर किडे दिसतीलच असे नाही. कारण काही स्ट्रॉबेरीमध्ये किडे नसूही शकतात.  

३. १० ते १५ मिनिटानंतर एक चाळण घेऊन त्यात या पाण्यांत भिजवलेल्या स्ट्रॉबेरी ओतून पाणी संपूर्णपणे गाळून घ्यावे. गाळून घेतलेल्या पाण्यात स्ट्रॉबेरी मधील धूळ आणि माती किंवा घाण उतरलेली आपल्याला दिसेल. त्यानंतर त्या पुन्हा एकदा दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

थंडीच्या दिवसांत चहा करताना वापरा ८ सिक्रेट पदार्थ, चहाचा स्वाद वाढेल-आरोग्यासही फायदेशीर...


 

मूठभर मूग-मूठभर उडीद-हिवाळ्यात खा पौष्टिक कुरकुरीत भजी! थंडीसाठी खास बेत-पाहा रेसिपी...

४. आता टिश्यू पेपर किंवा सुती कापडाच्या मदतीने या सगळ्या स्ट्रॉबेरी पुसून स्वच्छ करून घ्याव्यात. स्ट्रॉबेरी संपूर्णपणे कोरड्या करुन मगच स्टोअर कराव्यात. 

५. आता एका एअर टाईट कंटेनरच्या तळाशी टिश्यू पेपर अंथरुन त्यावर या स्ट्रॉबेरी ठेवून द्याव्यात. मग झाकण लावून त्या स्ट्रॉबेरी फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवाव्यात. 

अशा पद्धतीने आपण बाजारांतून विकत आणलेल्या स्ट्रॉबेरी स्वच्छ करुन आठवडाभरासाठी खराब न होऊ देता फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवू शकता.

Web Title: How to Clean Strawberries Properly How to Clean Strawberries So They Last Longer Best Ways to Wash Fresh Strawberries How to Clean Strawberries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.