Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोणच्यासाठी कोणती कैरी घ्यावी? 'अशी' घ्या लोणच्याची कैरी - वर्ष काय दोन वर्षे टिकेल लोणचे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2026 13:49 IST

Raw mango for pickle identification: Raw mango buying guide for pickle: महाराष्ट्रात लोणच्यासाठी राजापुरी किंवा तोतापुरी कैरीला मोठी पसंती आहे. यापासून तयार केलेले लोणचे वर्षभर फ्रेश आणि कडक ठेवायचे असेल तर कैरी कशी निवडायची पाहूया.

भारतीय जेवणाची थाळी आंब्याच्या लोणच्याशिवाय अपूर्ण आहे. वर्षभर टिकणारं आणि जिभेवर रेंगाळणारी चव देणारे लोणचं बनवणे ही एक कलाच. ताटाच्या डाव्या बाजूला लोणच्याची एक फोड असेल तर आत्मा तृप्त होतो. गरमागरम वरण आणि भातासह लोणचं खाणं म्हणजे स्वर्ग सुखच.(Raw mango for pickle identification) उन्हाळा सुरु झाला की आई-आजी नेहमीप्रमाणे कैरीचे लोणचे बनवते. अनेकदा लोणचं परफेक्ट बनतं पण खूप मेहनत घेऊनही लोणचे मऊ पडते किंवा त्याला बुरशी लागते. याचे कारण म्हणजे कैरीची चुकीची निवड. उन्हाळ्यात आपल्याला मार्केटमध्ये विविध कैऱ्यांचे प्रकार पाहायला मिळतात. पण प्रत्येक कैरी ही लोणच्यासाठी योग्य नसते. (Raw mango buying guide for pickle)महाराष्ट्रात लोणच्यासाठी राजापुरी किंवा तोतापुरी कैरीला मोठी पसंती आहे. राजापुरी हा महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये लोणच्यासाठी राजा मानला जातो.(How to choose mango for pickle) या कैऱ्यांची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचा गर आणि आंबटपणा लोणच्याला वेगळी चव देतो. यापासून तयार केलेले लोणचे वर्षभर फ्रेश आणि कडक ठेवायचे असेल तर कैरी कशी निवडायची पाहूया. 

५ मिनिटांत ५ व्यायाम, ब्रा फॅट कमी करण्यासाठी सकाळी करा 'एवढंच', पाठीवरचे फॅट्सही होईल कमी

महाराष्ट्रात लोणच्यासाठी राजापुरी कैरीला पहिली पसंती दिली जाते. या कैऱ्या आकाराने खूप मोठ्या आणि गोलसर असतात. राजापुरी कैरी खूप आंबट नसते आणि यात गरही भरपूर असतो. यात कोय लहान असल्यामुळे याच्या फोडी जास्त मिळतात. ज्यांना जास्त फोडींचे आणि जास्त मसाला असलेले लोणचे आवडते, त्यांच्यासाठी राजापुरी कैरी बेस्ट आहे. 

अनेक ग्रामीण भागात आजही गावठी कैऱ्यांचे लोणचे केले जाते. या आकाराने लहान असतात पण चवीला अतिशय आंबट असतात. गावरान कैरीच्या लोणच्याला विशिष्ट पारंपरिक चव आणि खमंग सुवास येतो. काही ठिकाणी कमी आंबट लोणचे हवे असल्यास किंवा 'तक्कू' किसलेले लोणचे करण्यासाठी तोतापुरीचा वापर केला जातो, पण ही कैरी वर्षभर टिकणाऱ्या फोडींच्या लोणच्यासाठी फारशी वापरली जात नाही.

कैरी खरेदी करताना कशी ओळखायची? 

1. सगळ्यात आधी कैरी हाताने दाबून पाहा. ती दगडासारखी कडक असायला हवी. जर कैरी थोडी मऊ वाटली तर समजा ती आतून पिकायला सुरुवात झाली आहे. अशा कैरीचे लोणचे लवकर खराब होते. 

2. कैरीचा रंग गडद हिरवा असायला हवा. त्यावर कुठेही काळे डाग किंवा चट्टे नसायला हवे. कैरीची त्वचा गुळगुळीत आणि तजेलदार असावी. 

3. कैरीच्या देठाच्या भागाचा वास घेऊन पाहा. जर तिथून आंबट आणि ताजा सुवास येत असेल तर ती कैरी लोणच्यासाठी उत्तम आहे. जर कुबट आणि गोडसर वास येत असेल तर ती खरेदी करु नका. 

4. कैरी कापल्यावर ती आतून पांढरी शुभ्र असावी. जर गर थोडा जरी पिवळसर दिसत असेल, तर त्याचा अर्थ कैरीचा आंबा होत आला आहे आणि त्याचे लोणचे वर्षभर टिकणार नाही.

5. कैऱ्या कापण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या आणि पूर्णपणे कोरड्या करा. कापताना हात, सुरी आणि साठवण्याची बरणी कोरडीच असायला हवी. लोणच्यात मीठ थोडं जास्त घाला, कारण मीठ नैसर्गिक संरक्षक म्हणून काम करते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Perfect pickle: Choose the right raw mango for long-lasting flavor.

Web Summary : Rajapuri or Totapuri mangoes are preferred for pickle-making. Select firm, green, and fragrant mangoes. Avoid soft or spotted ones. Ensure the inside is white. Dryness and extra salt are key for preservation.
टॅग्स :अन्नसमर स्पेशलपाककृती