Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुकरमध्ये १५ मिनिटांत करा तुरीच्या डाळीचं चवदार वरण, डाळ शिजवताना किती पाणी घालावं? पाहा योग्य प्रमाण आणि रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2026 09:30 IST

Tips to prevent dal water from leaking out of cooker: Quick and tasty Maharashtrian Varan recipe: वरण दाटसर आणि चविष्ट करण्यासाठी पाहूया काही सोप्या टिप्स.

गरमागरम तुरीच्या डाळीच वरण आणि भात सगळेच आवडीने खातात. वरणाचे बरेच प्रकार असले तरी साधं आणि फिकं वरण म्हणजे तुरीच्या डाळीचं. (Healthy and protein rich tur dal recipe) ही डाळ शिजवताना गृहिणींना येणारी मुख्य समस्या म्हणजे कुकरच्या शिट्टीतून डाळीचे पाणी बाहेर येणे, गॅस शेगडी खराब होणे. अनेकदा तर डाळ शिजल्यासारखीही वाटत नाही. जर आपण घाईत असू आणि झटपट वरण करायचे असेल तर १५ मिनिटांत चवदार वरणासाठी काही टिप्स लक्षात ठेवायला हव्या. (Pressure cooker cooking tips for beginners)
अनेकदा डाळ शिजवताना त्यात पाण्याचे प्रमाण जास्त होते किंवा अचानक पाहुणे आल्यावर नेमकं डाळीचं प्रमाण किती घ्यावं, पाणी किती घालावं समजत नाही.(Quick and tasty Maharashtrian Varan recipe) जर घरात ३ ते ४ व्यक्तींसाठी वरण बनवायचे असेल तर ५ मूठ डाळ पुरेशी असते. या ५ मूठ डाळीला किती शिट्ट्या कराव्यात आणि पाणी किती असावे, हे माहीत नसेल तर वरणाची चव बिघडू शकते. वरण दाटसर आणि चविष्ट करण्यासाठी पाहूया काही सोप्या टिप्स. 

भजी खा, वजन घटवा! तज्ज्ञांचा सल्ला- मॅजिकल हाय-प्रोटीन नाश्ता, वजन कमी करणारी सोपी रेसिपी

1. डाळ शिजवण्यापूर्वी २ ते ३ वेळा स्वच्छ धुवा आणि कोमट पाण्यात १५ मिनिटे भिजत ठेवा. यामुळे डाळ घट्ट आणि मऊ शिजते, तसेच गॅसचीही बचत होते. डाळ शिजायला घालताना त्यात अर्धा चमचा तेल किंवा तूप घाला. नंतर चिमूटभर हळद घाला. यामुळे शिट्ट्या होताना पाणी बाहेर येत नाही आणि कुकरही खराब होत नाही. डाळीचा रंगही छान येतो. 

2. डाळ शिजवताना त्यात लसूण पाकळ्या, चिरलेली हिरवी मिरची आणि हिंग घाला. यामुळे डाळीला चव येते. शिजल्यानंतर डाळीला रवीने न घोटता चमच्याने हलकी फेटून घ्या. ज्यामुळे त्याला परफेक्ट टेक्सचर मिळेल. 

3. ५ मूठ डाळीसाठी साधारणपणे एक लहान वाटी असते. १ वाटी डाळीसाठी ३ ते ३.५ कप पाणी घाला. वरण दाट आणि घट्ट हवे असेल तर त्यात ३ वाट्या पाणी पुरेसे आहे.  कुकरमध्ये डाळ टाकल्यानंतर डाळीच्या वर दीड ते दोन इंच पाणी घाला. 

4. मध्यम आचेवर ३ शिट्ट्या केल्यास तुरीची डाळ परफेक्ट शिजते. फोडणी देताना कढीपत्ता आणि मोहरीचा वापर करा, ज्यामुळे वरणाची चव आणि सुगंध दोन्ही छान येतो. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Quick & Tasty Tur Dal Varan in 15 Minutes: Recipe & Tips

Web Summary : Make delicious Tur Dal Varan quickly in a pressure cooker. Soak dal, add oil/ghee, spices, and the right water ratio. Cook for 3 whistles. Temper with curry leaves and mustard seeds for enhanced flavor.
टॅग्स :अन्नपाककृती