Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिरव्या भाज्या किती वेळा धुवायला हव्या? 'या' चुका टाळा, अळ्या न कळत जातात पोटात- भाजी साफ करण्याची योग्य पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2025 15:18 IST

Wash green leafy vegetables: How to clean leafy vegetables: Vegetable cleaning tips: हिरव्या भाज्या किती वेळा धुवायला हव्या, कोणत्या चुका टाळाव्यात जाणून घेऊया.

हिरव्या भाज्या या आपल्या जेवणाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. हिवाळा सुरु झाला की बाजारात ताज्या, फ्रेश हिरव्या भाज्या सर्वत्र पाहायला मिळतात.(Wash green leafy vegetables) पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, चवळीसारख्या अनेक भाज्यांमध्ये माती, धूळ, अळ्या आणि विशेषत:रासायनिक फवारणी देखील यावर केली जाते. अनेका वेळा आपल्याला असं वाटतं की भाजी स्वच्छ धुतोय. पण त्यावर चिकटलेली माती, कीटकनाशकांचा थर आणि अळ्या आपल्या पोटात जातात आणि आरोग्यावर दुष्परिणाम होतात. (How to clean leafy vegetables)हिरव्या भाज्या बाहेरुन नीट दिसल्या तरी त्यांच्या सूक्ष्म फटींमध्ये अळ्या लपलेल्या असतात. त्यासाठी अशा भाज्या वापरण्यापूर्वी त्या व्यवस्थित स्वच्छ करायला हव्या.(Vegetable cleaning tips) हिरव्या भाज्या किती वेळा धुवायला हव्या, कोणत्या चुका टाळाव्यात जाणून घेऊया. 

पालेभाज्या धुताना त्या पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पूर्णपणे बुडावा. धुतल्यानंतर लगेच पाणी काढून टाकू नका. हळूहळू पाने हाताने वर उचला. जर आपण पाणी फेकून दिले तर पुन्हा त्यावर घाण बसेल. तसेच फक्त हिरव्या भाज्या धुणे पुरेसे नाही. भाज्या या ३ किंवा ४ पाण्याने धुवायला हव्या. 

साडी नेसून दिसा आलिया भटसारखं उंच आणि सडपातळ, ५ साड्या-दिसाल सुपर ग्लॅमरस आणि देखण्या एलिगंट

कीटक आणि जंतू काढून टाकण्यासाठी काही घरगुती उपाय देखील करायला हवे. एका मोठ्या भांड्यात १ ते २ चमचे मीठ घालून पाणी तयार करा. या पाण्यात हिरव्या भाज्या ५ ते १० मिनिटे भिजवा. मीठ आणि व्हिनेगरमुळे जंतू मरण्यास मदत होते. पाण्यात १ चमचा व्हिनेगर मिसळून हिरव्या भाज्या धुणे ही देखील उत्तम पद्धत आहे. 

हिरव्या भाज्या धुतल्यानंतर पाने व्यवस्थित तपासून पाहा. पिवळी पडलेली, फाटलेली किंवा असंख्य छिद्रे असलेली पाने काढून टाका. जर आपल्याला त्यावर लहान किडे किंवा अळ्या दिसल्या तर ते काढून टाका. पालेभाज्या चिरण्यापूर्वी धुणे नेहमी चांगले. चिरल्यानंतर पाण्याने धुतल्यास पानांमधील पोषक घटक बाहेर पडू शकतात. पाने धुतल्यानंतर कोरडे झाल्यावर बारीक चिरुन घ्यायला हवे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Wash green leafy vegetables properly to avoid hidden worms and pesticides.

Web Summary : Wash leafy greens thoroughly multiple times in a large bowl. Soak in salted or vinegar water to remove germs. Inspect leaves, discard damaged ones, and wash before cutting to retain nutrients.
टॅग्स :अन्नपाककृती