सकाळच्या चहापासून ते मुलांच्या नाश्त्यापर्यंत दुधाशिवाय अनेक गोष्टी अपूर्ण आहे. बहुतेक घरांमध्ये पॅक्जेड दुधाचा वापर केला जातो. त्यामुळे अनेक घरात दूध उकळून फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय असते.(fridge milk safety) सकाळी घेतलेलं दूध संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी वापरायचं, हे अगदी सामान्य झालं आहे. मात्र फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे दूध कायम सुरक्षित राहतं, असा गैरसमज अनेकांना असतो.(is refrigerated milk safe) दूध किती दिवस पिणं योग्य आहे आणि ते खराब झालंय की नाही, हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे.(how long milk lasts in fridge)
दूध हे अतिशय संवेदनशील अन्नपदार्थ आहे. त्यामध्ये बॅक्टेरिया पटकन वाढू शकतात. दूध उकळल्यावर जरी जंतू कमी होत असले, तरी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही काही वेळेनंतर त्यात बदल होऊ शकतात. दूध फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर किती वेळात संपवायला हवं जाणून घेऊया.
दूध उकळवून रेफ्रिजरेटरमध्ये हवाबंद डब्यात साठवले तर ते साधारणपणे २ ते ३ दिवस टिकते. दुधाचे तापमान हे रेफ्रिजरेटरवर अवलंबून असते. दूध जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरचे तापमान ४ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असणं गरजेच आहे. गरम दूध फ्रीजमध्ये ठेवल्यास ते लवकर खराब होते.
सध्या बरेच लोक टोन्ड किंवा फुल क्रीम पॅकेज्ड दूध वापरतात. या दुधावर आधीच प्रक्रिया केलेली असते. टेट्रा- पॅक्ड किंवा अल्ट्रा पाश्चराइज्ड दूध सीलबंद पॅकेजिंगमध्ये एक्सपायरी डेटपर्यंत खराब होत नाही. हे दूध रेफ्रिजरेटरमध्ये साठवले असले तरीही उघडल्यापासून २ ते ३ दिवसांच्या आत संपवायला हवं.
पॅक केलेले दूध आधी स्वच्छ आणि गरम केलेले असते. याला पाश्चराइज्ड दूध म्हणतात. हे पिण्यास अधिक सुरक्षित असते. पण हे दूध वारंवार उकळवल्यानंतर त्यातील पोषक घटक कमी होतात. पॉलीपॅक केलेले दूध उकळवण्याची गरज नाही. ते कोमट गरम करुन पिता येते.
दुधाला आंबट किंवा विचित्र वास येऊ लागला तर ते खराब होते. तसेच चवीमध्ये देखील थोडासा बदल होतो. कधीकधी खराब झालेल्या दुधावर पातळ थर किंवा दाणेदार पोत दिसून येतो. दूध गरम करताना त्यात लहान गुठळ्या किंवा दाणे दिसले तर ते खराब होण्याचे लक्षण आहे. दुधाचा वास येत असेल तर ते पुन्हा वापरु नका.
