Join us  

How to make Instant Dosa : या विकेंडला घरीच बनवा ५ प्रकारचे इंस्टंट डोसे; या घ्या झटपट, स्वादिष्ट डोसा, सांबर रेसेपीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 5:52 PM

How to make Instant Dosa : अगदी कमीत कमी वेळात कमी साहित्यासह तुम्ही स्वादिष्ट डोसे बनवू शकता.

विकेंडला बाहेरच काहीतरी खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होते. रोजपेक्षा वेगळा नाश्ता, जेवण विकेंडला असावं असं घरातील मंडळींनाही वाटतं. सध्याचा अवकाळी पडणारा पाऊस आणि संसर्गजन्य आजार यामुळे प्रत्येकाला बाहेरचे कोणतेही अन्नपदार्थ खाताना १० वेळा विचार करावा लागतो. (Kitchen Tips) या विकेंडला नाश्त्याला काय बनवता येईल असा विचार करत असाल तर आज तुम्हाला डोसा रेसेपीज दाखवणार आहोत. अगदी कमीत कमी वेळात कमी साहित्यासह तुम्ही भरपूर डोसे बनवू शकता. (How to make Instant Dosa)  

साहित्य

एक कप रवा

एक कप तांदळाचे पीठ

दही

बारीक चिरलेली कोथिंबीर

चिरलेल्या हिरव्या मिरच्या

जिरंपूड

चिरलेला कांदा

चवीपुरते मीठ

गरजेपुरतं तेल

कृती

सगळ्यात आधी ४ चमचे दह्यात  थोडं पाणी घालून ताक बनवा

यामध्ये वरील सर्व साहित्य एकजीव करा. 

दहा ते पंधरा मिनिटे बॅटर तसेच ठेवा. 

बॅटर व्यवस्थित फुलल्यानंतर तवा गरम करा. नंतर तव्याला तेल लावून डोसा पसरवून घ्या 

डोसा कुरकुरीत करण्यासाठी कडेला तेल सोडा, तुम्ही आवडीनुसार यावर बटाट्याची भाजी घालू शकता.

गरमा गरम डोसा तयार झाल्यावर सांबर किंवा चटणीसोबत सर्व्ह करा. 

1) इस्टंट डोसा

2) रागी डोसा (Ragi dosa)

3) जाळीदार रवा डोसा (रवा डोसा)

4) गव्हाच्या पीठाचा डोसा  (Instant Atta Dosa Recipe)

 

सांबर रेसेपी

1)

2)

टॅग्स :अन्नपाककृती