थंडीत गरमागरम पदार्थ खाण्याची मजाच न्यारी. सूप, हॉट कॉफी, आल्याचा चहा याबरोबरच चॉकलेट प्रेमींना भुरळ पडते ती हॉट चॉकलेटची! पण डाएट, हेल्थ, वजन सगळ्याचाच मेळ घालायचा म्हटल्यावर मनाला मुरड न घालता पुढे दिलेली रेसिपी ट्राय करा. ही आरोग्यदायी आणि 'गिल्ट-फ्री' हॉट चॉकलेट क्लासिक रेसिपी हिवाळ्याची ट्रीट ठरेल. जी घरातल्या आबाल-वृद्धांनाही आवडेल. यात कॉर्नफ्लॉवर, साखर, क्रीम अजिबात नाही, तर याला दिला आहे पौष्टिक ट्विस्ट, कसा ते पाहू!
साहित्य
खजूर (Dates) ४
बदाम (Almonds)६
गरम साय काढलेले दूध (Hot Skimmed Milk) १/२ कप + १ कपदूध (Milk)१ कपपाणी (Water) १/४ कप
दालचिनीचा तुकडा (Cinnamon Stick)१
कोको पावडर (Cocoa Powder)१ टेबलस्पून
नाचणीचे पीठ (Ragi Flour)१ टेबलस्पून
डार्क चॉकलेट चिप्स (Dark Chocolate Chips) १.५ टेबलस्पून
बनवण्याची सोपी पद्धत (Suggessted Method)
सर्वप्रथम खजूर आणि बदाम गरम दुधात (१/२ कप) भिजवा. नंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून त्याची गुळगुळीत पेस्ट (Smooth Paste) तयार करा.
एका लहान भांड्यात नाचणीचे पीठ (१ टेबलस्पून) थोडे थंड दूध (१/४ कप) टाकून गुठळ्या न होता विरघळून घ्या. हे मिश्रण कॉर्नफ्लोरचे काम करेल.
एका सॉसपॅनमध्ये उर्वरित दूध (१ कप), पाणी आणि दालचिनीचा तुकडा एकत्र करून गरम करा.
दूध गरम झाल्यावर त्यात कोको पावडर आणि तयार केलेली खजूर-बदाम पेस्ट घाला. नीट ढवळून घ्या.
आता नाचणीच्या पिठाचे मिश्रण घालून मंद आचेवर सतत ढवळत रहा. मिश्रण घट्ट झाल्यावर डार्क चॉकलेट चिप्स घाला.
चॉकलेट विरघळल्यावर आणि मिश्रण एकजीव झाल्यावर दालचिनीचा तुकडा काढून टाका. गरम गरम सर्व्ह करा आणि गिल्ट-फ्री हॉट चॉकलेटचा आनंद घ्या!
नाचणी (Ragi) हॉट चॉकलेटचे फायदे
नाचणीमुळे हे पेय उच्च फायबरयुक्त बनते, जे पचनासाठी चांगले आहे.
साखर, कॉर्नफ्लोर आणि क्रीम नसल्याने हे डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम आहे.
नाचणी आणि बदाम एकत्र आल्याने हे एक संपूर्ण पौष्टिक पेय बनते.
थंडीच्या दिवसांत शरीराला त्वरित ऊर्जा मिळण्यास मदत करते.
पाहा रेसिपी व्हिडिओ -
