Lokmat Sakhi >Food > १५ मिनिटांत करा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत खाकरा! विकतपेक्षा भारी व पौष्टिक - लगेच होईल फस्त...

१५ मिनिटांत करा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत खाकरा! विकतपेक्षा भारी व पौष्टिक - लगेच होईल फस्त...

Homemade Wheat Flour Methi Masala Khakhra Recipe : Homemade Khakhra Recipe : How To Make Khakhra At Home : Methi Masala Khakhra Recipe : घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात इन्स्टंट पद्धतीने गव्हाच्या पिठाचा खाखरा तयार करण्याची रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2025 13:46 IST2025-09-12T13:03:46+5:302025-09-12T13:46:11+5:30

Homemade Wheat Flour Methi Masala Khakhra Recipe : Homemade Khakhra Recipe : How To Make Khakhra At Home : Methi Masala Khakhra Recipe : घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात इन्स्टंट पद्धतीने गव्हाच्या पिठाचा खाखरा तयार करण्याची रेसिपी...

Homemade Wheat Flour Methi Masala Khakhra Recipe Homemade Khakhra Recipe How To Make Khakhra At Home Methi Masala Khakhra Recipe | १५ मिनिटांत करा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत खाकरा! विकतपेक्षा भारी व पौष्टिक - लगेच होईल फस्त...

१५ मिनिटांत करा गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत खाकरा! विकतपेक्षा भारी व पौष्टिक - लगेच होईल फस्त...

'खाकरा' हा हलका - फुलका, कुरकुरीत आणि चविष्ट, पौष्टिक असा पारंपरिक स्नॅकचा पदार्थ आहे. खाकरा असा पदार्थ आहे की जो आपण सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या (Homemade Wheat Flour Methi Masala Khakhra Recipe) टी - टाइमपर्यंत कधीही खाऊ शकतो. मस्त कुरकुरीत, क्रिस्पी आणि खुसखुशीत (Homemade Khakhra Recipe) असा खाकरा खाण्याची मज्जा काही औरच असते. शक्यतो आपण खाकरा बाजारांतून विकत आणतो, सध्या बाजारांत देखील वेगवेगळ्या चवींचे तसेच फ्लेवर्सचे खाकरा विकत मिळतात. यासोबतच, आपण घरच्याघरीच देखील अगदी बाहेर विकत मिळतो तसाच खाकरा(Methi Masala Khakhra Recipe) घरी तयार करु शकतो.

आपल्यापैकी अनेकांना संध्याकाळच्या वेळी काहीतरी कुरकुरीत आणि चमचमीत खाण्याची इच्छा होते. पण रोज बाहेरचे तळलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. जर तुम्हाला चहाबरोबर खाण्यासाठी हेल्दी आणि टेस्टी स्नॅक हवं असेल, तर गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत खाकरा हा एक उत्तम पर्याय आहे. गव्हाच्या पिठापासून तयार केलेला खाकरा फक्त स्वादिष्टच नाही तर पौष्टिकही असतो. घरच्याघरीच अगदी सोप्या पद्धतीने हा हेल्दी स्नॅक तयार करून तो नाश्त्यात किंवा चहाबरोबर खाऊ शकतो. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात अगदी झटपट आणि इन्स्टंट पद्धतीने गव्हाच्या पिठाचा खाकरा तयार करण्याची रेसिपी पाहूयात... 

साहित्य :- 

१. गव्हाचे पीठ - १ कप 
२. बेसन पीठ - २ टेबलस्पून 
३. कसुरी मेथी - १ टेबलस्पून 
४. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून 
५. हळद - १/२ टेबलस्पून
६. मीठ - चवीनुसार 
७. धणेपूड - १/२ टेबलस्पून
८. जिरेपूड - १/२ टेबलस्पून 
९. जिरे - १ टेबलस्पून (भाजलेले)
१०. तेल - ४ ते ५ टेबलस्पून 
११. पाणी - गरजेनुसार 

कृती :- 

१. सगळ्यांतआधी एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ व बेसन अशी दोन्ही पीठ एकत्रित घेऊन कालवून घ्यावीत. 
२. त्यानंतर या पिठात कसुरी मेथी, लाल तिखट मसाला, हळद, चवीनुसार मीठ, धणेपूड, जिरेपूड, भाजलेलं जिर, तेल असे सगळे जिन्नस घालावेत. 
३. आता या मिश्रणात गरजेनुसार थोडे - थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. (पाणी थोडे कमीच घालून नेहमीपेक्षा पीठ थोडे अधिक घट्ट मळून घ्यावे.)

मळून ठेवलेली कणिक किती दिवसात खराब होते? पाहा फ्रिजमध्ये कणिक किती दिवस ठेवणं योग्य?

ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतरची झोप आवरत नाही ? टिफिनमध्ये न्या २ पदार्थ - झोप अजिबातच येणार नाही... 

४. पीठ मळून घेतल्यानंतर या तयार पिठाचे छोटे, मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यावेत. 
५. हे तयार गोळे चपातीप्रमाणेच परंतु थोडे पातळ असे गोलाकार लाटून घ्यावेत. 
६. गरम तव्यावर घालून नेहमीप्रमाणे चपात्या भाजतो तसेच मंद आचेवर हळूहळू थोडे कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यावेत. 
७. थोडे तेल शिंपडून चमच्याने हलकेच दाब देत, खाकरा मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावा. 

मस्त गरमागरम असा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक खाकरा खाण्यासाठी तयार आहे. असा हा खाकरा आपण सकाळचा नाश्ता, किंवा मधल्या वेळेत भूक लागली म्हणून किंवा संध्याकाळच्या टी - टाईमच्या वेळी देखील खाऊ शकता.


Web Title: Homemade Wheat Flour Methi Masala Khakhra Recipe Homemade Khakhra Recipe How To Make Khakhra At Home Methi Masala Khakhra Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.