उन्हाळ्यात हमखास प्रत्येक घरोघरी वाळवणाचे पदार्थ तयार केले जातात. या वाळवणाच्या पदार्थांमध्ये पापड, कुरडया, लोणची असे पदार्थ केले जातात. या पदार्थांसोबतच बटाट्याचे वेफर्स देखील केले जातात. वेफर्स हा जगभरातील सर्व वयोगटांतील व्यक्तींचा आवडता पदार्थ आहे. आपल्याला सगळ्यांना बटाट्याचे वेफर्स, केळीचे वेफर्स, विविध चवींचे वेफर्स किंवा विविध (Homemade Raw Banana Chips Recipe) प्रकारच्या फ्रेंच फ्राईज खायला खूप आवडते. एकदा वेफर्स (How to make healthy banana chips at home) खायला सुरुवात केल्यावर कोणीही स्वत:ला थांबवू शकत नाही, ही वस्तुस्थिती देखील सगळेच मान्य करतील. आपल्याकडे संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी, लहान मुलांना खाऊच्या डब्ब्यात देण्यासाठी म्हणून हे वेफर्स सहज खाल्ले जातात(Banana Wafers At Home Easy Recipe To Make Crispy Fresh Wafers).
यंदाच्या उन्हाळ्यात बटाटाच्या वेफर्ससोबतच, कच्च्या केळ्याचे देखील वेफर्स नक्की ट्राय करून पाहा. कोणत्याही प्रकारचे कृत्रिम रंग, कृत्रिम चव यांचा वापर न करता नैसर्गिक व पारंपरिक पद्धतींचा वापर करून हे वेफर्स आपण घरीच तयार करु शकतो. केरळची ही अनोखी पाककृती आता तुम्ही घरच्या घरी झटपट करू शकता. कच्च्या केळ्याचे अतिशय कुरकुरीत, चटकदार, पातळ व तळलेले वेफर्स घरी करणे आता सोपे झाले आहे. कच्च्या केळ्यापासून हे वेफर्स कसे तयार करायचे हे समजून घेऊयात.
साहित्य :-
१. कच्ची केळी - ४ ते ५ केळी (हिरवी सालं असणारी)
२. नारळाचे तेल - ३ कप (तळण्यासाठी)
३. हळद - १ टेबलस्पून
४. मीठ - आवडीनुसार
५. पाणी - १ कप
खरबुजाच्या बिया फेकून नुकसान करु नका, करा १० मिनिटांत खरबूज बियांचे मिल्कशेक! उन्हाळा गारेगार...
शिळा उसाचा रस पिऊन पडाल आजारी! पाहा काढल्यानंतर उसाचा रस ‘किती’ वेळात प्यायला हवा..
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका बाऊलमध्ये चवीनुसार मीठ आणि हळद एकत्रित करून घ्यावे. त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून पातळसर द्रावण तयार करून घ्यावेत.
२. आता कच्ची केळी स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घ्या.
३. एका मोठ्या कढईत तेल ओतून, तेल व्यवस्थित गरम करून घ्यावे. तेल गरम झाल्यावर किसणीच्या मदतीने केळ्याचे गोलाकार काप करून थेट तेलात सोडावेत. किंवा आपण केळ्याचे काप आधी देखील करून ठेवू शकता.
४. आता या कढईत तयार करून घेतलेले मीठ व हळदीचे द्रावण हातांनी थोडे थोडे शिंपडून घ्यावे.
५. मग वेफर्स छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावेत. केळ्याचे वेफर्स हलकेच सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्या.
६. कढईतून तळून काढल्यानंतर हे वेफर्स टिशू पेपरवर काढा. यामुळे वेफर्समधील जास्तीचे तेल शोषून घेतले जाईल.
हे लक्षात ठेवा -
१. हे वेफर्स थंड झाल्यावर एका हवाबंद डब्ब्यात किमान एक आठवड्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता.