Join us
Daily Top 2Weekly Top 5

मैदा नाही, प्रिझर्व्हेटिव्हजही नाही! फक्त १० मिनिटांत करा विकतसारखे कुरकुरीत 'नाचोज', मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट खाऊ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2025 16:31 IST

Homemade Nachos Recipe : How To Make Healthy Nachos At Home : Nachos Recipe : अतिशय सोप्या पद्धतीने 'होममेड हेल्दी नाचोज' कसे करायचे याची सोपी रेसिपी...

आजकाल मुलांना बाहेरचे जंक फूड खाण्याची सवय फार मोठ्या प्रमाणांत लागलेली दिसते. मुलांना बाहेरचे कुरकुरीत पदार्थ खूप आवडतात, त्यातही 'नाचोज' (Nachos) म्हणजे मुलांचा सर्वात आवडता स्नॅक्स. बाजारात मिळणाऱ्या नाचोजमध्ये जास्त मीठ, तेल आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असल्यामुळे ते मुलांच्या आरोग्यासाठी नेहमीच योग्य नसतात. बाहेर विकत मिळणारे नाचोज चवीला चांगले असले तरी ते आरोग्यासाठी तितकेसे फायदेशीर नसतात. अशा परिस्थितीत, मुलांसाठी घरच्याघरीच हेल्दी पद्धतीने नाचोज तयार करणं हा उत्तम पर्याय ठरू शकतो. घरच्याघरीच तयार केलेलं हे नाचोज इतके कुरकुरीत होतात की मुलं विकतचे नाचोज खाणेच विसरून जातील. हे नाचोज आपण मेयोनीज, चीज किंवा घरच्याघरीच बनवलेला 'साल्सा' सॉस यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता(Homemade Nachos Recipe).

सगळ्यात विशेष म्हणजे हे नाचोज एकदा तयार करून आपण एअर टाईट कंटेनरमधेही किमान महिनाभर तरी साठवून ठेवू शकतो. घरच्याघरी बनवलेले नाचोज चवीला खमंग (Nachos Recipe) तर असतातच, शिवाय त्यात आपण मुलांच्या (How To Make Healthy Nachos At Home) आवडीनुसार आणि आरोग्याला पोषक असे पदार्थ वापरून ते अधिक हेल्दी करु शकतो. अतिशय सोप्या पद्धतीने 'होममेड हेल्दी नाचोज' कसे करायचे याची सोपी रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. मक्याचे पीठ - १ कप २. मैदा / गव्हाचे पीठ - १/२ कप (गव्हाचे पीठ देखील वापरु शकता)  ३. हळद - १/२ टेबलस्पून ४. लाल तिखट मसाला पावडर - १ टेबलस्पून ५. मीठ - चवीनुसार६. मिरेपूड - १/२ टेबलस्पून ७. मिक्स हर्ब्स - १ टेबलस्पून ८. पाणी - गरजेनुसार९. तेल - तळण्यासाठी१०. पेरी - पेरी मसाला - १ टेबलस्पून 

हिवाळ्यात गारव्याने चपात्या कडक-वातड होतात? ६ टिप्स - शिळी चपातीही राहील मऊसूत नरम...

नको डाळ-तांदूळ, नको पीठ आंबवण्याची झंझट! तरी फक्त १५ मिनिटांत करा पांढरीशुभ्र, गुबगुबीत जाळीदार इडली.... 

कृती :- 

१. एका मोठ्या बाऊलमध्ये मैदा आणि मक्याचे पीठ घेऊन ते एकत्रित कालवून घ्यावे. २. आता या पिठाच्या मिश्रणात, हळद, लाल तिखट मसाला पावडर, चवीनुसार मीठ, मिरेपूड, मिक्स हर्ब्स घालावे. ३. सगळ्यात शेवटी या मिश्रणात थोडे तेल घालावे आणि गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालत पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. ४. पीठ मळून घेतल्यानंतर या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून ते चपातीप्रमाणेच गोलाकार लाटून घ्यावेत. 

५. मग सुरीच्या मदतीने बरोबर या लाटलेल्या गोलाकार भागामध्ये चौकोनी आकार काढून घ्यावा. या चौकोनी तुकड्यावर काटा चमच्याने छोटे छोटे छिद्र पाडून घ्यावेत, मग याला नाचोजचा त्रिकोणी आकार द्यावा. ६. गरम तेलात नाचोज सोडून ते खरपूस तळून घ्यावेत. ७. तळून घेतलेले नाचोज एका बाऊलमध्ये काढून त्यावर पेरी - पेरी मसाला भुरभुरवून घालावा. 

मस्त चटपटीत, चमचमीत, मसालेदार असे विकतसारखे उत्तम चवीचे हेल्दी नाचोज खायला तयार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Healthy Homemade Nachos Recipe: Quick, preservative-free snack for kids' tiffin.

Web Summary : Make healthy, crispy nachos at home in minutes! This recipe uses simple ingredients and avoids preservatives, offering a nutritious snack option perfect for kids' lunchboxes. They can be stored for a month.
टॅग्स :अन्नपाककृती