उन्हाचा तडाखा वाढला असून आपल्या अंगाची लाहीलाही होते आहे. अशावेळी काहीतरी थंडगार खाण्याची किंवा पिण्याची इच्छा सतत होते. घसा कोरडा पडू लागतो, कितीही पाणी प्यायलं तरी तहान काही जात नाही. अशा वेळी लहान मुले बाहेरच्या रंगीत पेप्सी किंवा आईस कँडीसाठी हट्ट धरतात. (Best summer dessert using kokum syrup) पण बाहेर मिळणाऱ्या कँडीजमध्ये अनेकदा कृत्रिम रंग आणि भरपूर साखरेचा वापर केला जातो. ज्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशावेळी घरच्या घरी बनवलेली 'कोकम आईस कँडी' हा एक उत्तम, चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहे. (Tangy and sweet kokum ice bars)कोकम हे नैसर्गिकरित्या थंड आणि पित्तशामक मानले जाते. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी कोकम सरबत पिण्याचा सल्ला दिला जातो. याच सरबताला जर आपण कँडीचे स्वरूप दिले, तर मुले ती मोठ्या आवडीने खातात. (Healthy summer treats for kids) आंबट-गोड आणि चटपटीत चवीची ही कोकम आईस कँडी केवळ जिभेला चव देत नाही, तर उन्हामुळे होणारा थकवा दूर करून शरीराला ताजेतवाने करते. ही कोकम आईस कँडी बनवायची कशी, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
साहित्य
कोकम सरबत सिरम- १ छोटा ग्लास भिजवलेला सबजा - १ मोठा चमचाजिरे पावडर - १ चमचाकाळ मीठ - चवीनुसार पाणी साखर - हवी असल्यास
कृती
1. सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात साखर विरघळवून घ्या. त्यात कोकम सरबत किंवा आगळ मिक्स करा.
2. यात भिजवलेला सबजा, जिरे पावडर, काळं मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्या. एकदा चव चाखून पहा, ज्यामुळे आंबट-गोडपणा आपल्या आवडीनुसार असेल.
3. तयार झालेले हे कोकम मिश्रण आईस कँडीच्या साच्यात किंवा लहान प्लॅस्टिकच्या पेप्सी बॅग्समध्ये भरा. हे साचे फ्रीजरमध्ये साधारण ७ ते ८ तास किंवा रात्रभर सेट होण्यासाठी ठेवा.
4. कँडी पूर्णपणे सेट झाल्यावर साचा बाहेर काढून थोडा वेळ साध्या पाण्यात धरा, जेणेकरून कँडी सहज बाहेर येईल. तयार होईल आंबट-गोड चवीची कोकम आईस कँडी.
Web Summary : Escape the summer heat with refreshing homemade Kokum ice candy! This tangy, sweet treat uses natural Kokum syrup, offering a healthy alternative to store-bought options. Easy to make with simple ingredients, it's a perfect way to cool down and rejuvenate.
Web Summary : गर्मी से राहत पाने के लिए घर पर बना कोकम आइस कैंडी! यह खट्टा-मीठा व्यंजन प्राकृतिक कोकम सिरप का उपयोग करता है, जो बाजार में मिलने वाले विकल्पों का एक स्वस्थ विकल्प है। इसे बनाना आसान है और यह गर्मी से राहत पाने का एक शानदार तरीका है।