Join us

हिरव्या मिरच्या खराब होतात बुरशी लागते ? करा वर्षभर टिकणारी हिरवी पावडर - मिरच्या स्टोअर करण्याची भन्नाट युक्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2025 20:30 IST

Homemade green chilli powder : How to make green chilli powder at home : Dry green chilli powder recipe : थंडीत विकत मिळणाऱ्या ताज्या हिरव्या मिरच्यांची पावडर कशी तयार करायची याची सोपी रेसिपी पाहूयात..

शक्यतो, थंडीच्या दिवसांत बाजारांत आपल्याला ताज्या, फ्रेश हिरव्यागार भाज्या, फळे मोठ्या प्रमाणांत विकायला ठेवलेली दिसतात. आपण एकदा बाजारांत गेल्यावर ताज्या, हिरव्यागार भाज्या पाहून विकत घेण्याचा मोह आवरता येत नाही. याच कारणामुळे आपल्यापैकी अनेक गृहिणी एकाच वेळी बाजारांत गेल्यावर भरपूर भाज्या, फळे आणि सोबतच हिरव्यागार मिरच्या विकत घेऊन येतात. मिरचीशिवाय स्वयंपाकघरातील अनेक पदार्थांची चव अपूर्णच आहे. (Dry green chilli powder recipe).

मिरची रोजच्या वापरातील असल्याने अनेक पदार्थांमध्ये आपण हमखास मिरची घालतो. पण या बाजारांतून एकदम एकाचवेळी विकत आणलेल्या मिरच्या काही दिवसांतच (How to make green chilli powder at home) मऊ पडतात, सडू लागतात किंवा त्यांवर बुरशी येते आणि त्या फेकून द्याव्या लागतात. त्यामुळे अनेकदा मिरच्या विकत घेताना त्या एकदम घेऊन स्टोअर करायच्या की नाही, असा प्रश्न पडतो. या समस्येवर, एक अतिशय सोपा, आणि दीर्घकाळ टिकणारा इन्स्टंट उपाय म्हणजे हिरव्या मिरचीची पावडर तयार करून स्टोअर करणे. थंडीत विकत मिळणाऱ्या ताज्या हिरव्या मिरच्यांची पावडर कशी तयार करायची, ती दीर्घकाळ कशी स्टोअर (Homemade green chilli powder) करावी आणि या पावडरचा वापर स्वयंपाकात कशा प्रकारे करता येईल याची सोपी झटपट रेसिपी पाहूयात...  

हिरव्यागार ताज्या मिरच्या वर्षभर स्टोअर करुन ठेवण्यासाठी खास घरगुती उपाय... 

ताज्या हिरव्यागार मिरच्या विकत आणल्या की त्या लगेच खराब होतात, यासाठी त्या टिकवून ठेवण्यासाठी आपण खास एक भन्नाट ट्रिक वापरु शकतो. हिरव्या मिरच्या खराब होऊ नये म्हणून त्याची पावडर तयार करण्याची सोपी युक्ती... ही पावडर तयार केल्यास, आपण फक्त हिरव्या मिरच्या खराब होण्यापासून वाचवत नाही, तर वर्षभर, विशेषतः थंडी नसतानाही, मिरचीचा नैसर्गिक तिखटपणा आणि चव टिकवून ठेवू शकता. तसेच, यामुळे तुमच्या स्वयंपाकातील वेळही वाचतो आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा मिरचीची चव वापरता येते.   

मिक्सरमध्ये वाटल्यासारखं ‘असं’ फिरवा ढोकळ्याचं पीठ, कापसाहून हलका जाळीदार ढोकळा करण्याची सोपी ट्रिक...

हिरव्या मिरचीची पावडर कशी तयार करावी ? 

आकाराने थोड्या जाड आणि तिखट हिरव्या मिरच्या जास्त प्रमाणात विकत आणल्यास, मिरच्या स्वच्छ धुवून ३ ते ५ दिवस उन्हात ठेवून व्यवस्थित वाळू द्या. असे केल्याने मिरची रोज पालटत राहिल्यास ती पूर्णपणे कुरकुरीत होईल. जर ऊन नसेल, तर तुम्ही ओव्हनमध्ये ६० ते ७०°C तापमानावर ४ ते ५ मिनिटे कुरकुरीत भाजून घेऊ शकता. लक्षात ठेवा, मिरचीमध्ये ओलावा राहू नये, नाहीतर पावडरमध्ये बुरशी लागू शकते.

भोपळ्याच्या बियांची चटणी, वेटलॉससाठी पंपकिन सीड्स खाण्याचा पारंपरिक चटकदार मार्ग-पाहा इन्स्टंट रेसिपी...

जर तुम्हाला तिखट मिरची पावडर हवी असेल, तर मिरचीच्या बिया काढू नका. यानंतर मिक्सरमध्ये, थोड्या - थोड्या मिरच्या घालून त्याची बारीक पूड करून घ्यावी. मिरची वाटताना मिक्सर जास्त गरम होऊ नये, नाहीतर पावडर खराब होऊ शकते. मिरची बारीक केल्यानंतर त्यात मीठ आणि थोडे हिंग मिसळून पुन्हा एकदा १ मिनिट मिक्सर फिरवून घ्यावा. 

हिरव्या मिरचीची पावडर स्टोअर करण्यासाठी, तुम्ही एअरटाइट कंटेनरमध्ये भरून थंड आणि कोरड्या जागी ठेवू शकता. या पावडरचा रंग टिकवून ठेवायचा असेल, तर तुम्ही ती ६ ते १२ महिने फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. ही पावडर वर्षभर वापरण्यासाठी ती नेहमी कोरड्या चमच्यानेच बाहेर काढावी. अशाप्रकारे आपण थंडीच्या दिवसांत मिळणाऱ्या हिरव्यागार ताज्या मिरच्यांची वर्षभर टिकणारी पावडर तयार करुन स्टोअर करून ठेवू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Preserve green chilies: Make year-long green chili powder easily at home.

Web Summary : Learn how to make green chili powder at home to preserve chilies for a year. Dry, grind, and store in an airtight container for fresh flavor anytime.
टॅग्स :अन्नपाककृती