कडाक्याच्या थंडीत जेवणाची खरी रंगत वाढते, ती तोंडी लावण्यासाठी ताटात एखादा चटकदार आणि तिखट पदार्थ असला तरच...शक्यतो हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात मिळणाऱ्या ताज्या हिरव्यागार मिरचीचे पारंपरिक लोणचे खाल्ले, तर जेवण अक्षरशः फस्त होईल. थंडीच्या दिवसांत हिरव्या मिरच्या ताज्या, चांगल्या आणि तिखट चवीला अप्रतिम अशा मिळतात, त्यामुळे त्यांचं लोणचं करण्यासाठी हिवाळा सर्वोत्तम मानला जातो(Homemade Green Chilli Instant Pickle Recipe).
कमी वेळात तयार होणारं, फार दिवस टिकणारं आणि जेवणाची चव एकदम वाढवणारं पारंपरिक इंस्टंट हिरव्या मिरचीचं लोणचं हा घराघरांतील प्रत्येकाचा आवडता पदार्थ... लोणचे म्हटलं की, ते तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि ते मुरण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागते, परंतु हिरव्या मिरचीचं लोणचं आपण इन्स्टंट तयार (green chilli instant pickle recipe) करून लगेच खाऊ शकता. अगदी थोड्या साहित्यांत, घरच्याघरी झटपट तयार होणाऱ्या आणि हिवाळ्यात खास रुचकर लागणाऱ्या या लोणच्याची खास रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. हिरव्या मिरच्या - १ किलो (फिकट हिरव्या रंगाच्या)२. बडीशेप - २ टेबलस्पून ३. पिवळी राई - ३ ते ४ टेबलस्पून ४. हिंग - १/२ टेबलस्पून ५. मीठ - चवीनुसार ६. गरम तेल - २ ते ३ टेबलस्पून ७. लिंबाचा रस - २ टेबलस्पून
इडली साच्याला चिकटते, आकार बिघडतो? ९ सोप्या टिप्स - इडली साच्यातून सहज सुटेल, तुटणारही नाही...
गोडआंबट चवीचं पारंपरिक वरण करण्याची पाहा घरगुती रेसिपी, वरण-भात तूप म्हणजे सुख...
कृती :-
१. सगळ्यातआधी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून त्या व्यवस्थित सुकवून घ्या. २. या हिरव्या मिरच्या एकदम बारीक तुकडे होतील अशा कापून घ्या. ३. एका मोठ्या मिक्सरच्या भांडयात पिवळी राईची डाळ, बडीशेप असे सगळे जिन्नस एकत्रित घेऊन व्यवस्थित वाटून त्याची बारीक पावडर वाटून घ्यावी.
४. मिक्सरमध्ये वाटून घेतलेली बारीक पूड एका बाऊलमध्ये काढून त्यात गरम तेल ओतून ते चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. मग हे मिश्रण कालवून त्यावर झाकण ठेवून १० मिनिटे झाकून ठेवावे. ६. १० मिनिटानंतर या मिश्रणात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार लिंबाचा रस घालून सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे.
हिरव्यागार मिरचीचे मस्त चटपटीत, चमचमीत इन्स्टंट लोणचं खाण्यासाठी तयार आहे. हे मिरचीचं लोणचं आपण साधा डाळ - भात, चपाती, भाकरी सोबत तोंडी लावायला म्हणून खाऊ शकतो. या चमचाभर लोणच्यामुळे साध्या जेवणाचीही रंगत वाढते.
Web Summary : Enjoy this instant green chili pickle, a flavorful winter accompaniment. This recipe uses fresh green chilies, fennel seeds, mustard seeds, asafoetida, salt, hot oil, and lemon juice. Ready quickly, it enhances simple meals like dal-rice or roti.
Web Summary : इंस्टेंट हरी मिर्च के अचार का आनंद लें, जो सर्दियों का एक स्वादिष्ट व्यंजन है। इस रेसिपी में ताज़ी हरी मिर्च, सौंफ के बीज, सरसों के बीज, हींग, नमक, गरम तेल और नींबू का रस का उपयोग किया जाता है। यह जल्दी से तैयार हो जाता है और दाल-चावल या रोटी जैसे साधारण भोजन को भी स्वादिष्ट बना देता है।