Join us
Daily Top 2Weekly Top 5

फॅन्सी डाएटचं वेड सोडा! खा हाय प्रोटीन सोया फ्राइड राईस, चमचमीत पौष्टिक भाताची सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2025 09:30 IST

Soya fried rice: High protein fried rice: Healthy rice recipe: हाय प्रोटीन फ्राइड राईस कसा बनवायचा पाहूया.

आजकाल वजन कमी करायचं म्हटलं की लोक लगेच फॅन्सी डाएट्सकडे वळतात. कधी सलाड तर उकडलेले खातात. तर कधी पॅकेटबंद प्रोटीन शेक्सवर अवलंबून राहतात.(Soya fried rice) पण या सगळ्या डाएट्समध्ये एक मोठी अडचण असते ती सतत भूक लागणे, आवडते पदार्थ न खाणे. त्यामुळे काही दिवसांतच हा डाएट आपल्याला कंटाळवाणा वाटू लागतो.(High protein fried rice) अशावेळी आपण घरच्या घरी हाय प्रोटीन सोया फ्राइड राईस ट्राय करु शकतो. (Healthy rice recipe)सध्याच्या धावपळीच्या जगात वेळ ही मोठी समस्या आहे. अशावेळी सोया फ्राइड राईस हा झटपट बनणारा आणि डब्यासाठीही योग्य असा पर्याय.(Protein rich Indian food) ऑफिस, कॉलेज किंवा वर्कआउटनंतरच्या जेवणासाठी हा पदार्थ अतिशय उपयोगी. हा चविष्ट असल्यामुळे घरातल्या इतरांनाही तो आवडतो. डाएट वेगळं, जेवण वेगळं असं करावं लागत नाही.(Weight loss dinner ideas) हाय प्रोटीन फ्राइड राईस कसा बनवायचा पाहूया. 

९० च्या दशकातील 'या' अभिनेत्रीला मिळाली होती बोल्ड फोटोशूटची शिक्षा, आईनेही मारले होते कानशिलात आणि..

साहित्य 

उकडलेले सोया - १ कप आलं-लसूण पेस्ट - १ चमचा लाल मिरची पावडर - अर्धा चमचा शिजवलेला भात - २ कप बारीक चिरलेले आले-लसूण - १ चमचा बारीक चिरलेले कांदा - १ बारीक चिरलेला गाजर - १बारीक चिरलेली शिमला मिरची - १ बारीक चिरलेली फरसबी - १ छोटी वाटीबारीक चिरलेला कोबी - १/२ कपबारीक चिरलेली कांद्याची पात - २ चमचेमीठ - चवीनुसार रेड चिली फ्लेक्स- अर्धा चमचा काळी मिरी - अर्धा चमचा सोया सॉस - १ चमचारेड चिली सॉस - १ चमचा व्हिनेगर - १ चमचा तेल - दीड चमचा

कृती 

1. सगळ्यात सोयाबिन पाण्यात वाफवून घ्या. त्यानंतर आलं-लसूण पेस्ट आणि लाल मिरची पावडर घालून मॅरिनेट करा. आता गॅसवर पॅन ठेवून त्यात तेल घाला. मॅरिनेट केलेले सोया फ्राय करुन घ्या. 

2. पुन्हा पॅनवर तेल घालून त्यात तेल, आलं-लसूण, कांदा, कांद्याची पात, फरसबी, गाजर, कोबी, शिमला मिरची आणि मीठ घालून चांगले परतवून घ्या. भाज्या सर्व व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात शिजवलेला भात घाला. 

3. आता वरुन सर्व मसाले, सोया सॉस, रेड चिली सॉस,सोयाबिन परतवून घ्या. तयार होईल हाय प्रोटीन सोया फ्राइड राईस. 

English
हिंदी सारांश
Web Title : Skip Fancy Diets! Try High Protein Soya Fried Rice Recipe

Web Summary : Ditch restrictive diets! This high-protein soya fried rice is a quick, healthy, and delicious alternative. Perfect for weight loss and a tasty meal for everyone.
टॅग्स :अन्नपाककृती