Join us

School Tiffin Box Recipe : शाळेच्या डब्यासाठी अप्पेपात्रात करा झटपट पिझ्झा बाईट्स! मुलांसाठी पौष्टिक खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2025 12:18 IST

School tiffin recipes: Healthy lunch box ideas: आपल्याला देखील मुलांना बाहेरचे खायला आवडत असेल तर घरीच त्यांच्यासाठी करा हेल्दी पिझ्झा बाईट्स 

मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये काय द्यावं असा प्रश्न पालकांना रोजच पडतो.(school tiffin box recipe) मुलांनी पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खावे यासाठी पालक अधिक मेहनत घेतात.(Healthy lunch box ideas) त्यासाठी आई स्वयंपाकघरात रोज नवनवीन प्रयोग देखील करत असते.(Kids snack recipes) शाळेच्या डब्यात मुलांना तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो.(Quick pizza bites) मुलांचा टिफिन बॉक्स हेल्दी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मुलांना सतत बाहेरचे जंक फूड खाण्याची आवड असते. सतत ब्रेड- पिझ्झा आणि मैद्याचे पदार्थ खाऊन मुलांच्या वाढीवर देखील परिणाम होतो.(Appe pan recipes) जर आपल्याला देखील मुलांना बाहेरचे खायला आवडत असेल तर घरीच त्यांच्यासाठी करा हेल्दी पिझ्झा बाईट्स 

School Tiffin Box Recipe : शाळेच्या डब्यासाठी कुरकुरीत दोडक्याचा टाकोज! नावडती दोडकीही होतील आवडती

साहित्य 

भिजवलेले हिरवे मूग - १ वाटी कोथिंबीर - गरजेनुसार रवा - १ छोटी वाटी आले-लसूण पाकळ्या मिरची दही - १ छोटी वाटी पुदीन्याची पाने मीठ - चवीनुसार तूप - १ चमचा पिझ्झा-पास्ता सॉसबारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली सिमला मिरची उकडलेले कॉनचीज मिक्स हर्ब्स 

भाजी-आमटीत 'या' पद्धतीने घाला गरम मसाला, ९० टक्के लोक करतात १ चूक- छातीत जळजळ- अपचनाचा होतो त्रास

कृती 

1. सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले हिरवे मूग, कोथिंबीर, रवा, आले-लसूण, दही, मिरची, पुदिन्याची पाने घालून त्याची बारीक पेस्ट करुन घ्या. ही पेस्ट बॅटरसारखी व्हायला हवी. 

2. आता एका भांड्यात तयार बॅटर काढून त्यात मीठ घालून चांगले मिक्स करुन घ्या. अप्पे पात्राला गरम करुन तूप लावून घ्या. तयार बॅटर अप्पे पात्राच्या भांड्यात पसरवून घ्या. दोन मिनिटे वाफ काढा 

3. टॉपिंगसाठी पिझ्झा - पास्ता सॉस पसरवा. वरुन बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, उकडलेले कॉन, चीज आणि मिक्स हर्ब्स घाला. दोन मिनिटे वाफ काढून घ्या. तयार होईल अप्पेपात्रातील झटपट पिझ्झा बाईट्स. 

 

टॅग्स :अन्नपाककृती