सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचे हा गृहिणींसमोर मोठा प्रश्न असतो. बटाट्याची आलू टिक्की चवीला छान लागतेच, पण रोज-रोज बटाटे खाल्याने वजन वाढण्याची आणि कॅलरीज वाढण्याची भीती असते.(healthy breakfast ideas) जे लोक वेट लॉस किंवा फिटनेसचा विचार करतात, त्यांच्यासाठी बटाटा हा फारसा उत्तम पर्याय ठरत नाही. (weight loss breakfast)
अशा वेळी जर आपल्याला चटपटीत आणि तरीही पौष्टिक काहीतरी खायचे असेल, तर 'सातूची टिक्की' (Sattu Tikki) हा आपल्यासाठी परफेक्ट आणि हेल्दी पर्याय आहे. बिहारचा 'सुपरफूड' मानले जाणारा सातू जगभरात हाय-प्रोटीन गुणांमुळे प्रसिद्ध होत आहे. सातूची टिक्की कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य पाहूया.
साहित्य
सातूचे पीठ - १ कप
बारीक चिरलेला कांदा - अर्धा कप
बारीक चिरलेली हिरवी मिरची - १
पाणी - ३/४ कप
आमचूर पावडर - अर्धा चमचा
लिंबाचा रस - १ चमचा
जिरे - अर्धा चमचा
ओवा - अर्धा चमचा
मीठ - चवीनुसार
तेल - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी बाऊलमध्ये सातूचे पीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, आमूचर पावडर, लिंबाचा रस आणि पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा.
2. आता कढईमध्ये तेल गरम करुन त्यात जिरे, ओवा, बारीक चिरलेला कांदा घालून चांगले परतवून घ्या. त्यात तयार सातूचे बॅटर घालून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.
3. सातूचे बॅटर थंड झाल्यानंतर टिक्की तयार करा. पॅनवर तेल गरम करुन त्यावर टिक्की फ्राय करुन घ्या.
