Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपभर पोह्यांचे व्हेजिटेबल लॉलीपॉप! खमंग, कुरकुरीत लॉलीपॉपची सोपी रेसिपी, मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2026 18:00 IST

poha vegetable lollipop: poha snacks recipe: healthy kids lunchbox snack: पोह्यांचे व्हेजिटेबल लॉलीपॉप कसे बनवायचे पाहूया.

सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक भागवण्यासाठी नेहमीचे पोहे, उपमा, वडा किंवा भजीसारखे पारंपरिक पदार्थ खातो. पण रोज तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो.(poha vegetable lollipop) नेहमीच्या पोह्यांना थोडा हटके ट्विस्ट देऊन काहीतरी वेगळं, चविष्ट आणि दिसायलाही आकर्षक बनवता येतं. ( poha snacks recipe)मिक्स व्हेज पोहे लॉलीपॉप हा असाच एक नाविन्यपूर्ण पदार्थ आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. पोह्यांमध्ये भाज्यांचा समावेश असल्यामुळे हा पदार्थ पौष्टिकही ठरतो आणि तळलेला असला तरी तरी योग्य प्रमाणात खाल्ल्यास हेल्दी स्नॅक म्हणून नक्कीच खाऊ शकतो.(healthy kids lunchbox snack) पार्टी, किटी पार्टी, मुलांचा डबा किंवा संध्याकाळच्या चहासोबत देण्यासाठी मिक्स व्हेज पोहे लॉलीपॉप एक परफेक्ट पर्याय आहे. पोह्यांचे व्हेजिटेबल लॉलीपॉप कसे बनवायचे पाहूया. 

बर्फ-दूध-मधाचा फेस मास्क, रशियन मुलींसारखा ग्लो येईल चेहऱ्यावर! ओपन पोअर्स- पिंपल्स होतील कमी

साहित्य पोहे - २०० ग्रॅमगाजर - १बारीक चिरलेली फरसबी - १/४ कप अर्धी चिरलेली कोबीचिरलेली कांद्याची पात - १/४ कप कांदा - १मीठ - चवीनुसार उकडलेले मटार- १/४ कपउकडलेले बटाटे- २ ते ३ मध्यमकोथिंबीर- १/४ कपचिली फ्लेक्स - २ ते ३चाट मसाला- १ चमचागरम मसाला - १ चमचा बारीक चिरलेलं आलं - १ चमचा हिरव्या मिरच्या - २ ते ३

कृती

1. सगळ्यात आधी पोहे भिजवून घ्या. त्यानंतर बटाटे उकडवून कुस्करुन घ्या. यानंतर मिक्सरच्या भांड्यात कांदा, गाजर,फरसबी, कोबी, उकडलेले मटार मिक्समध्ये वाटून घ्या. 

2. आता भिजवलेले पोहे, बटाटे आणि मिक्सरमधील सर्व साहित्य एकत्र करा. त्यानंतर त्यात मीठ. आले-लसूण पेस्ट, कांद्याची पात, कोथिंबीर घाला. त्यात सर्व मसाले घालून हलक्या हाताने मळून घ्या. 

3. स्टिकमध्ये सारण लावून वरुन तीळ लावा. कढईमध्ये तेल गरम करुन त्यात तळून घ्या. हिरव्या चटणीसोबत खा पोह्यांचे व्हेजिटेबल लॉलीपॉप. 

English
हिंदी सारांश
Web Title : Poha Vegetable Lollipop: Crispy, tasty, and easy recipe for kids!

Web Summary : Mix Veg Poha Lollipop is a unique, nutritious snack loved by all. It's perfect for parties, kids' lunchboxes, or evening tea. Make it with simple steps.
टॅग्स :अन्नपाककृती