दिवाळी म्हटलं की घराघरात फराळाचा सुगंध, गोडवा दरवळत असतो. (Methi Mathri recipe) चकली, लाडू, करंज्या, शंकरपाळे यांच्यासोबत आपल्याला काही तिखट खावेसे वाटते. यात असते ती मेथी मठरी. कुरकुरीत खमंग आणि विविध मसाले घालून तयार केलेला पदार्थ.(Wheat flour Methi Mathri) विकतच्या मिळणाऱ्या पदार्थांमध्ये तेलाचा पुन्हा पुन्हा वापर केला जातो. त्यामुळे त्या जास्त तेलकट आणि पोटासाठी जड असतात.(Crispy Methi Mathri) पण घरगुती सोप्या पद्धतीने केलेली मेथी मठरी मात्र अगदी आरोग्यदायी आणि टिकाऊ असते.(Healthy Mathri recipe)
मेथी मठरी आपण गव्हाच्या पिठापासून देखील बनऊ शकतो. ज्यामुळे पौष्टिकही असेल. ही मठरी आरोग्य आणि चव दोन्हीचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.(How to make Methi Mathri at home) मुलांसाठी आणि पाहुण्यांसाठी हा खास पदार्थ कसा बनवायचा पाहूया. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.
ना रवा ना मैदा, 'असे' करा गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत शंकरपाळे-कमी तेलकट अन् भरपूर पूडाचे
साहित्य
गव्हाचे पीठ - दीड कप
रवा - अर्धा कप
परतून घेतलेली मेथीची भाजी/ कसुरी मेथी
हळद- १ चमचा
जिरेपूड - १ चमचा
हिंग - १ चमचा
जाडसर कुटून घेतलेले ओवा-बडीशेप - १ चमचा
मीठ - चवीनुसार
साखर - १ चमचा
तीळ - १ चमचा
तूप - ४ चमचे
तांदळाचे पीठ - ३ चमचे .
तेल - तळण्यासाठी
दिवाळीची पार्टी होईल चौपट भारी, घरीच करा ७ सोपे झटपट होणारे पदार्थ, पाहुणेही होतील खूश
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला मेथीची भाजी छान वाफेवर परतवून घ्यावी लागेल. त्यानंतर एका मोठ्या ताटात गव्हाचे पीठ, रवा घाला. त्यात परतवलेली मेथी घाला. यानंतर सर्व मसाले एकत्र करुन कणिक चांगले मळून घ्या.
2. कणकेचे गोळे करुन घ्या. आता एका गोळ्याला चपातीसारखे लाटून घ्या. त्यावर तांदळाचे पीठ आणि तूपाची एकत्र केलेली पेस्ट लावा. त्यावर पुन्हा एक चपाती लाटून तांदळाच्या पीठाचे पेस्ट लावा. असं सगळ्या पीठाच्या गोळ्यांचे करा.
3. आता सगळ्या चपातीला गोल करा. सुरीच्या मदतीने वड्या पाडा. वडीला मस्त पदर सुटलेला पाहायला मिळेल. एक-एक वडीला लाटण्याने लाटून घ्या. आणि मंद आचेवर तेला तळा. तयार होईल मेथीची खमंग-कुरकुरीत मठरी.