Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातील चिप्स- वेफर्सपेक्षा भारी घरीच करा कुरकुरीत ज्वारी-नाचणीची पापडी, मुलांसाठी खास चटपटीत खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2026 09:30 IST

Low oil evening snacks recipe for children: How to make crunchy Ragi Papdi at home: पौष्टिक, चटपटीत आणि कुरकुरीत ज्वारी-नाचणीची पापडी कशी बनवायची पाहूया त्याची रेसिपी.

सध्याच्या काळात मुलांना पाकिटबंद चिप्स, कुरकुरे किंवा वेफर्स खाण्याची सवय लागते.ही सामान्य गोष्ट असली तर त्यात असणारे अतिरिक्त तेल, मैदा, प्रिझर्व्हेटिव्ह्ज मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरु शकतात. (Chatpatit healthy khau recipe for school tiffin)पालकांसाठी रोज संध्याकाळी मुलांना काहीतरी चवदार आणि आरोग्यदायी खाऊ देणे हे मोठे आव्हान असते. अशा वेळी बाजारातील जंक फूडला एक उत्तम, पौष्टिक आणि तितकाच चटपटीत पर्याय म्हणजे घरच्या घरी बनवलेली ज्वारी-नाचणीची कुरकुरीत पापडी. (How to make crispy papdi with less oil)
सध्या मुलांसाठी उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. अशातच ते सतत भूक लागली असं म्हणतात. सहसा मुले नाचणी किंवा ज्वारीची भाकरी खाण्यास टाळाटाळ करतात, पण जेव्हा आपण याच पिठांपासून कुरकुरीत, मसालेदार पापडी बनवून देता, तेव्हा मुले ती स्नॅक्स म्हणून अगदी आवडीने आणि कुरूम-कुरूम आवाज करत खातात.(Gluten free healthy snacks for toddlers Indian) ही पौष्टिक, चटपटीत आणि कुरकुरीत ज्वारी-नाचणीची पापडी कशी बनवायची पाहूया त्याची रेसिपी. 

थ्रेडिंग-वॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्यावर दाणे- लाल चट्टे येतात? 'हा' पांढरा पदार्थ करेल जादू, पिंपल्स-ओपन पोर्स, जळजळ होईल कमी

साहित्य 

ज्वारीचे पीठ: २ कप
नाचणीचे पीठ: २ कप
भिजवलेली मूग डाळ: १/४ कप
तेल (मोहनसाठी): ४ मोठे चमचे (tbsp)
तीळ: २ लहान चमचे (tsp)
जिरे: १ लहान चमचा (tsp)
ओवा: १/४ लहान चमचा (tsp)
हिरवी मिरची: ५ ते ६
लसूण: १० ते १२ पाकळ्या
आले: १ इंच तुकडा
कढीपत्ता: १० ते १२ पाने (बारीक चिरलेली)
मीठ: दीड लहान चमचा (किंवा चवीनुसार)
कडकडीत गरम पाणी: गरजेनुसार
तळण्यासाठी तेल

कृती 

1. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, आले आणि लसूण एकत्र करुन पाण्याचा वापर न करता जाडसर वाटून घ्या. 

2. त्यानंतर एका मोठ्या परातीत किंवा भांड्यात २ कप ज्वारीचे पीठ, २ कप नाचणीचे पीठ आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. ४ मोठे चमचे तेल एका छोट्या भांड्यात कडकडीत गरम करुन पीठात घाला. चमच्याने पीठ व्यवस्थित मिक्स करा. 

3. आता त्या पिठात भिजवलेली मूग डाळ, जिरे, ओवा, तीळ, मिक्सरमध्ये तयार केलेले आले-लसूण- मिरचीचे जाडसर वाटण आणि बारीक चिरलेला कढीपत्ता घाला. हे सर्व पिठात चांगले एकजीव करुन घ्या. 

4. या मिश्रणामध्ये साधारण दीड ते दोन कप कडकडीत गरम पाणी घाला. चमच्याने व्यवस्थित मिक्स करा आणि त्यावर झाकण ठेवून १० मिनिटे वाफ येण्यासाठी बाजूला ठेवून द्या. १० मिनिटानंतर पीठ थोडे कोमट असताना हाताने चांगले मळून त्याचा घट्ट गोळा तयार करा. गरज वाटल्यास वरुन थोडे कोमट पाणी घाला. 

5. मळलेल्या पिठाचे गोळे तयार करुन त्याची चपाती लाटा. त्यावर फोकने खड्डे करा. गोल वाटीने छोटे छोटे आकार द्या. 

6. कढईत तेल चांगले गरम करुन घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा. तयार पापडी तेलात सोडून दोन्ही बाजूने छान, खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. 

7. थंड झाल्यावर ही चटपटीत पापडी हवाबंद डब्यात भरून ठेवा आणि चहा किंवा संध्याकाळचा खाऊ म्हणून याचा आनंद घ्या. 

 


English
हिंदी सारांश
Web Title : Healthy homemade millet crisps: A tasty alternative to junk food.

Web Summary : Ditch unhealthy chips! Make crispy, healthy millet crisps at home. This recipe uses sorghum and finger millet flour with spices for a delicious, nutritious snack that kids will love. Perfect for summer holidays, these homemade crisps are a great alternative to store-bought junk food.
टॅग्स :अन्नपाककृती