Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहमीच्या पावभाजीला द्या हेल्दी ट्विस्ट! २० मिनिटांत करा ढाबा स्टाईल हरीभरी पावभाजी- मुलेही खातील आवडीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2026 09:30 IST

Haribhari pav bhaji recipe Marathi: Dhaba style green pav bhaji recipe: ढाब्यावर मिळणारी ही हरीभरी पावभाजी कशी बनवायची ते पाहूया. यासाठी लागणारे कृती आणि साहित्य जाणून घ्या.

पावभाजी म्हटलं की डोळ्यासमोर येते की लालभडक, लोण्याने माखलेली आणि झणझणीत भाजी. अगदी लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांच्या आवडीची डिश. पण नेहमीची तीच ती लाल पावभाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तिला आपण एक 'हेल्दी आणि ग्रीन ट्विस्ट' देऊ शकतो.(Haribhari pav bhaji recipe Marathi) उन्हाळ्यात किंवा सणासुदीला जेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं आणि चविष्ट खावसं वाटतं, तेव्हा 'हरीभरी पावभाजी' हा एक उत्तम पर्याय ठरतो.(Dhaba style green pav bhaji recipe)ही पावभाजी केवळ दिसायलाच वेगळी नाही, तर ती चवीलाही तितकीच अप्रतिम लागते. यात सर्व हिरव्या भाज्या घालून तिची चव वाढवली जाते. आपल्या मुलांना हिरव्या पालेभाज्या आवडत नसतील तर अशी आगळी-वेगळी रेसिपी नक्की ट्राय करुन बघा. ढाब्यावर मिळणारी ही हरीभरी पावभाजी कशी बनवायची ते पाहूया. यासाठी लागणारे कृती आणि साहित्य जाणून घ्या. 

तरुण आणि स्टायलिश दिसायचं तर ब्लाऊजच्या ‘या’ ५ नेकलाइन निवडा, चुकीच्या नेकलाइनमुळे तुम्ही दिसता म्हाताऱ्या

साहित्य 

बारीक चिरलेली शिमला मिरची - १ कपआले-लसूण- हिरवी मिरची पेस्ट - १ चमचाबारीक चिरलेला कांदा - १ वाटी तेल - २ चमचेहिरवे वाटाणे - १ वाटीउकडलेला बटाटा - १ वाटीपालक प्युरी - १ वाटीगरम पाणी - १ कपगरम मसाला - १ चमचा पावभाजी मसाला - १ चमचा धने पावडर - १ चमचा मीठ - चवीनुसारबटर - १ चमचाकोथिंबीर - आवश्यकतेनुसारबारीक चिरलेला लसूण - १ चमचा लाल तिखट - १ चमचा

कृती 

1. सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल गरम करुन घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा परतवून घ्या. नंतर त्यात आले-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट घालून परतवून घ्या. कांद्याचा रंग बदलल्यानंतर त्यात शिमला मिरची घालून व्यवस्थित परतवा. 

2. यामध्ये आता हिरवे वाटाणे घाला. नंतर उकडलेला बटाटा स्मॅश करुन घ्या. नंतर संपूर्ण मिश्रण व्यवस्थित स्मॅशरने घोटून घ्या. त्यात वरुन पालक प्युरी घालून मिक्सर करा. कपभर गरम पाणी घालून चांगले एकजीव होऊ द्या. 

3. यामध्ये आता गरम मसाला, पावभाजी मसाला, धने पावडर, मीठ घालून मिक्स करा. उकळी आल्यानंतर त्यात बटर घाला. चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्या. वरुन कोथिंबीर पेरा. 

4. फोडणी पात्रात तेल गरम करुन त्यात लसूण आणि लाल तिखट घालून फोडणी तयार करा. ही फोडणी भाजीमध्ये घाला. गरमागरम खा हरीभरी पावभाजी. 

English
हिंदी सारांश
Web Title : Healthy Twist to Pav Bhaji: Dhaba-Style Green Pav Bhaji Recipe

Web Summary : Give pav bhaji a healthy makeover with this green version. Made with green vegetables like capsicum, peas, and spinach, this recipe is a great way to get kids to eat their greens. Enjoy this dhaba-style dish in just 20 minutes!
टॅग्स :अन्नपाककृती