दिवाळी म्हटलं की गोडधोड पदार्थ, फराळ आणि घरभर सुगंध पसरवणारे पारंपरिक पदार्थ. पण गोडासोबत तिखट पदार्थ देखील अनेकांना खायला आवडतात.(Namkeen Mathri recipe) दिवाळीत आपल्याला विविध प्रकारचे स्नॅक्स खायला आवडतात.(Diwali snacks recipe) पार्टी किंवा पाहुणे आपल्यानंतर आपण विविध पदार्थ बनवतो. स्नॅक्समध्ये कसुरी मेथी, चकली, चिवडा आणि मठरी हमखास असते.(Crispy mathri at home) जर तुम्ही या दिवाळीत घरी खास नमकीन बनवण्याचा विचार करत असाल तर आपण मठरी बनवू शकता. (Healthy mathri recipe) हवाबंद डब्यात साठवल्यास कुरकुरीत राहतात. दिवाळीत संध्याकाळी पाहुण्यांना आणि नातेवाईकांना देण्यासाठी अगदी कमी वेळात आणि साहित्यात मार्केटसारखी कुरकुरीत मठरी घरी कशी बनवायची पाहूया.(Easy festive snacks) जाणून घेऊया साहित्य आणि कृती
गुलाबजाम- रसगुल्ल्याचा पाक फेकून न देता करा झटपट ५ पदार्थ, पाक वाया न जाता चविष्ट पक्वान्न
साहित्य
मैदा - २ कप
रवा - २ चमचे
तूप - २ चमचे
कसुरी मेथी - १/२ चमचा
ओवा - १/२ चमचा
काळी मिरी पावडर - १/२ चमचा
मीठ - चवीनुसार
पाणी - गरजेनुसार
तेल तळण्यासाठी
ना रवा ना मैदा, 'असे' करा गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत शंकरपाळे-कमी तेलकट अन् भरपूर पूडाचे
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला एका ताटात मैदा, रवा आणि तूप घालून चांगले मिसळून घ्यावे लागेल. त्यात चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर, कसुरी मेथी आणि ओवा घालून मिक्स करा.
2. पीठ व्यवस्थित मिक्स करुन त्यात मळण्यासाठी थोडे थोडे पाणी घालून कणिक तयार करा. झाकून १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा. नंतर पिठाचे छोटे गोळे करुन लहान पुऱ्या बनवा. तळलेल्या पुऱ्यांना काट्याच्या चमच्याने छोटे होल करा. मठरी कुरकुरीत करण्यासाठी त्यात तुपाचे मोहन घाला.
3. एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात मंद आचेवर पुऱ्या तळून घ्या. तळल्यानंतर टिश्यू पेपरवर काढा आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरा.