Amrud Achar Recipe: हिवाळ्यात आंबट गोड पेरू खाण्याचा वेगळी मजा असते. या दिवसात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच पेरूचा आनंद लुटतात. जास्तीत जास्त लोक पेरूला मीठ लावून खातात. पेरूची टेस्ट तर चांगली असतेच, सोबतच पेरूचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. पेरूचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. अशात आज आम्ही तुम्हाला पेरूचं चटपटीत लोणचं कसं तयार करावं याची रेसिपी सांगणार आहोत.
लोणचं बनवण्यासाठी साहित्य
दोन पेरू
दोन हिरव्या मिरच्या
हळद पावडर
लाल मिरची पावडर
एक छोटा चमचा राई
1/4 चमचा मेथी दामे
1/4 चमचा हींग
चवीनुसार मीठ
1 मोठा चमचा गूळ
दोन मोठे चमचे मोहरीचं तेल
कसं कराल तयार?
पेरू चांगले धुवून त्याचे छोटे छोटे तुकडे करा. कढईमध्ये तेल गरम करा. राई, मेथी दाणे, हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि हिरव्या मिरचीचा तडका तयार करा. यात पेरूचे तुकडे टाका. थोडा वेळ फ्राय करा. नंतर त्या मीठ आणि गूळ टाका. गूळ वितळू लागल्यावर गॅस कमी करा. नंतर गॅस बंद करा. लोणचं तयार झाल्यावर त्यात थोडा लिंबाचा रस टाका. लोणचं तयार आहे. हे तुम्ही फ्रिजमध्ये 15 दिवस स्टोर करू शकता.