Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > थंडीत खा अस्सल गावरान चवीचा कुळीथाचा झुणका, पौष्टिक आणि झणझणीत- कंबरदुखीवर रामबाण उपाय

थंडीत खा अस्सल गावरान चवीचा कुळीथाचा झुणका, पौष्टिक आणि झणझणीत- कंबरदुखीवर रामबाण उपाय

kulithacha zunka: traditional Maharashtrian recipe: कुळीथाचा झुणका कसा बनवायचा पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2025 16:31 IST2025-11-02T16:30:33+5:302025-11-02T16:31:03+5:30

kulithacha zunka: traditional Maharashtrian recipe: कुळीथाचा झुणका कसा बनवायचा पाहूया.

health benefits of kulith zunka in winter how to make authentic gavran kulithacha zunka at Home back pain and bone health food | थंडीत खा अस्सल गावरान चवीचा कुळीथाचा झुणका, पौष्टिक आणि झणझणीत- कंबरदुखीवर रामबाण उपाय

थंडीत खा अस्सल गावरान चवीचा कुळीथाचा झुणका, पौष्टिक आणि झणझणीत- कंबरदुखीवर रामबाण उपाय

झुणका भाकर हा महाराष्ट्रातला पारंपरिक अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. झुणका हा गरमागरम भाकरीसोबत खायला अतिशय चविष्ट लागतो.(kulithacha zunka) झुणक्याचे दोन प्रकार आहेत. एक पातळ आणि दुसरा मोकळा.(traditional Maharashtrian recipe) रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आपण झणझणीत झुणका ट्राय करु शकतो.(winter healthy recipes) झुणका हा दोन पदार्थांनी बनतो. बेसनचा झुणका हा नेहमीच खाल्ला जातो. पण कुळीथाचा झुणका हा गावातील विशिष्ट भागात आवडीने खातात.(kulith recipe benefits) 
कुळथाचा झुणका हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातला पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ आहे. विशेषत: विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात हा पदार्थ लोकप्रिय आहे.(back pain home remedy food) थंडीच्या दिवसांत हा झुणका जास्त करून बनवला जातो कारण तो शरीराला उष्णता आणि ताकद देतो. यात प्रथिने, लोह, आणि कॅल्शियम असते. कुळीथाचा झुणका कसा बनवायचा पाहूया. (Maharashtrian village food)

गारसलेल्या आंबटगोड चिंचेची चटणी, नाव काढलं तरी तोंडाला सुटते पाणी! पाहा पारंपरिक चटणी

साहित्य 

कुळीथ पीठ - १ वाटी 
तेल - १ चमचा 
चिरलेला लसूण - १ चमचा 
चिरलेला कांदा - १ वाटी 
चिरलेली हिरवी मिरची - २ ते ३
चिरलेला टोमॅटो - १ वाटी 
लाल मिरची पावडर - १ चमचा 
हळद - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 
पाणी - आवश्यकतेनुसार 
चिरलेली कोथिंबीर - आवश्यकतेनुसार 

कृती 

1. सगळ्यात आधी कुळीथला चांगले भाजून घ्या. त्याचा पावडर करुन पीठ तयार करा. आता एका पातेल्यात तेल गरम करुन त्यात चिरलेला लसूण, कांदा आणि हिरवी मिरची घालून लालसर होईपर्यंत परतवून घ्या. 

2. त्यानंतर टोमॅचो, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ घालून पुन्हा व्यवस्थित परतवून घ्या. वरुन कुळीथ पीठ घालून पुन्हा मिक्स करुन घ्या. आता वरुन थोडे पाणी शिंपडून घ्या. 

3. पातेल झाकूण त्यावर थोडे पाणी घाला. ज्यामुळे  कुळीथ लवकर शिजेल. १५ ते २० मिनिटे वाफ येण्यासाठी ठेवा. अधेमधे चमच्याने ढवळत राहा, ज्यामुळे ते कढईला चिकटणार नाही. हवे तर थोडे पाणी देखील घालू शकता. शिजल्यानंतर वरुन चिरलेली कोथिंबीर घाला. 
 


Web Title : कुलीथ झुणका: सर्दियों की खुशी, पौष्टिक, मसालेदार और पीठ दर्द का उपाय

Web Summary : कुलीथ झुणका, एक पारंपरिक महाराष्ट्रीयन व्यंजन, सर्दियों के दौरान ग्रामीण क्षेत्रों में विशेष रूप से लोकप्रिय है। प्रोटीन, आयरन और कैल्शियम से भरपूर यह व्यंजन गर्मी और शक्ति प्रदान करता है। कुलीथ के आटे, लहसुन, प्याज और मसालों से बना, यह स्वादिष्ट और सेहतमंद विकल्प है, जो पीठ दर्द के घरेलू उपाय के रूप में जाना जाता है।

Web Title : Kulith Zunka: A Winter Delight, Nutritious, Spicy, and Back-Pain Remedy

Web Summary : Kulith Zunka, a traditional Maharashtrian dish, is especially popular in rural areas during winter. This protein, iron, and calcium-rich dish provides warmth and strength. Made with kulith flour, garlic, onion, and spices, it's a flavorful and healthy option, known as a home remedy for back pain.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.