पावसाळा सुरु झाला की, बाजारात अनेक प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळतात.(Keni chi bhaji) रानभाज्या या आपल्या आरोग्यासाठी देखील अधिक चांगल्या असतात. या रानभाज्यांपैकी एक केनीची भाजी.(traditional monsoon food) ही भाजी फारशी शहरात पाहायला मिळत नाही. पण गावाकडच्या बाजारात किंवा कडेवर सहज मिळते.(ranbhaji health benefits) पावासाळ्यात तिच्या पानांची चव देखील अप्रतिम लागते. या भाजीच्या पानाची भजी तयार केली जाते. हा पदार्थ खायला अगदी चटपटत आणि चविष्ट लागतो.(ranbhaji bhaji)
केनीची भाजी फक्त स्वादिष्ट नाही तर पौष्टिक देखील आहे.(Monsoon food) यात भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम,फायबर आणि जीवनसत्त्व असतात. जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. या रानभाजीची भजी कशी करायची पाहूया. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहा.
केळीचे वेफर्स होतील अगदी कुरकुरीत! ५ भन्नाट टिप्स – कमी तेलात तळा, जास्त दिवस टिकतील
साहित्य
बेसन - अर्धी वाटी
तांदळाचे पीठ - २ चमचे
तेल - २ चमचे
हळद - पाव चमचा
लाल तिखट -अर्धा चमचा
ओवा - अर्धा चमचा
हिंग- पाव चमचा
मीठ - चवीनुसार
पाणी
इडलीचं पीठ काही केल्या फुगत नाही? 'अण्णाची' ही एक ट्रिक वापरा, कापसाहून मऊसुत-टम्म फुगेल इडली
कृती
1. सगळ्यात आधी केनीची भाजी स्वच्छ करुन दोन पाण्याने धुवून घ्या. आता एक बाऊलमध्ये बेसनाचे पीठ, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, हिंग घाला. त्यात ओवा घालताना तो हातावर घासून मग पीठात घाला. मीठ आणि गरम तेल घाला. वरुन पाणी घालून हाताने सर्व साहित्य मिक्स करुन त्याची पातळ पेस्ट करा.
2. आता कढईत तेल गरम करुन केनीचे पान पीठात कालवून घ्या. तेल व्यवस्थित तापल्यानंतर मंद आचेवर भजी तळून घ्या. तेल व्यवस्थित गरम झाले असेल तर भजी चांगली फुगतात. ताटात काढून थंड झाल्यानंतर सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खा.