मुलं लहान असली की, खाण्यापिण्यासाठी अधिक नाटक करतात. (Drumstick soup for kids) त्यामुळे पालकांना त्यांना नेमकं काय द्यावं हेच कळतं नाही.(Benefits of drumstick pods) हल्ली मुलांना बाहेरचे चटकदार पदार्थ खाण्याची सवय लागली आहे. त्यामुळे त्यांना सतत पिझ्झा, बर्गर खावेसे वाटते.(Drumstick recipes for immunity) लहान मुलांचं आरोग्य चांगलं राहावं असं प्रत्येक आईला वाटतं मुलांच्या रोजच्या आहारात पौष्टिकता द्यायची असेल तर त्यांना पदार्थांची चवही आवडायला हवी.(Drumstick soup health benefits) याची सांगड म्हणजे गुणकारी आणि सोपा पदार्थ शेवग्याच्या शेंगाचं सूप. (Natural immunity booster for children)शेवग्याच्या शेंगांना सुपरफूड म्हटलं जातं. यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, व्हिटॅमिन C, लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.(Drumstick for strong bones) जे मुलांच्या हाडांची वाढ योग्य पद्धतीने करून त्यांना ताकद देतात. शेवग्याच्या शेंगाचं सूप शरीरासाठी उत्तम मानलं जातं. कोणत्याही आजारात किंवा कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हे सूप पिऊ शकते. शेवग्याचे सूप बनवायचे कसे पाहूया.(drumstrick soup recipe)
केळीचे वेफर्स होतील अगदी कुरकुरीत! ५ भन्नाट टिप्स – कमी तेलात तळा, जास्त दिवस टिकतील
साहित्य शेवग्याच्या शेंगा – ४कांदा – १आले-लसूण – ८-१० इंचहिरवी मिरची – १कोथिंबीर – आवश्यकतेनुसार तमालपत्र – १लवंग – २दालचिनी – २ इंचमीठ – चवीनुसारगरम पाणी – आवश्यकतेनुसारकाळं मीठ – ½ चमचाजिरेपूड – ½ चमचाकाळी मिरी पूड – ½ चमचालिंबाचा रस – १ चमचापुदिना – सजावटीसाठीबटर - १ चमचा
इडलीचं पीठ काही केल्या फुगत नाही? 'अण्णाची' ही एक ट्रिक वापरा, कापसाहून मऊसुत-टम्म फुगेल इडली
कृती
1. सगळ्यात आधी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करुन घ्या. नंतर गॅसवर कुकर गरम करुन त्यात १ चमचा बटर, लसूण, आले आणि खडा मसाला घाला. उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घाला. त्यात शेवग्याची शेंग घालून चांगले परतवून घ्या. आता त्यात १ लिटर गरम पाणी आणि मीठ घाला. कुकरचे झाकण लावून ४ ते ५ शिट्ट्या करा.
2. आता कुकर थंड झाल्यानंतर सर्व साहित्य गाळून घ्या. मिक्सरच्या भांड्यात गाळून घेतलेलं साहित्य आणि कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्या. शिजवलेल्या शेंग्याच्या पाण्यामध्ये ही पेस्ट चाळणीने गाळून घ्या.
3. त्यानंतर गॅसवर तयार सूप उकळण्यासाठी ठेवा. त्यात मीठ, काळं मीठ, जिरेपूड आणि काळीमिरी पूड घालून ५ ते ७ मिनिटं उकळा. वरून लिंबाचा रस, कोथिंबीर आणि पुदिन्याने सजवा. गरमागरम शेवग्याचे सूप सर्व्ह करा.