बाजारात एप्रिल महिन्यामध्ये खुप छान कैऱ्या मिळतात. कैरीचे विविध पदार्थ आपण तयार करतो. (Have you ever eaten Amchur chutney? A mouth-watering dish)किंवा मग आंबट चवीसाठी कैरी चटणीमध्ये तसेच भेळ किंवा इतरही काही पदार्थांमध्ये वापरतो. कैरीचे पन्हे तर तयार करतोच. कैरीची डाळ म्हणजेच आंबे डाळही सगळ्यांना फार आवडते. एक साठवणीचा पदार्थ कैरीचा तयार करता येतो. तो म्हणजे आमचूर पावडर. सगळ्यांच्या घरी आमचूर पावडर तर असतेच. (Have you ever eaten Amchur chutney? A mouth-watering dish)चवीला खुपच छान लागते. विविध पदार्थांमध्ये वापरता येते. आमचूर घरी तयार करणं फारच सोपं आहे.
आंबट-गोड चटणी आपण तोंडी लावायला घेतो. लिंबाची चटणी असेल किंवा मग चिंचेची अशी चटणी फारच छान लागते. आमचूर पावडरचीही चटाकेदार चटणी तयार करता येते. अनेक महिने टिकते. (Have you ever eaten Amchur chutney? A mouth-watering dish)चवीला मस्त लागते. तयार करायलाही अगदीच सोपी. घरी तयार केलेल्या आमचूर पावडरची चटणी आणखीच चविष्ट लागते.
आमचूर पावडरची रेसिपी
साहित्य
कैरी, लिंबू, हळद
कृती
१. मस्त आंबट गोड कैरी वापरा. कैरीची सालं सोलून घ्या. आणि मग कैरी छान किसून घ्या.
२. किसून झाल्यावर त्यामध्ये थोडा लिंबाचा रस पिळा. चमचाभर हळद लावा. छान मिक्स करून घ्या.
३. एका ताटामध्ये किंवा प्लास्टिकवर तयार किस पसरवून ठेवा. मोकळा राहील याची काळजी घ्या. कैरी ४ ते ५ दिवस उन्हामध्ये वाळवा. सगळं पाणी निघून जाईल आणि कैरीचा किस कडक होईल.
४. मग तो किस मिक्सरमधून वाटून घ्या. त्याची छान पावडर तयार करा. हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा.
आमचूर चटणीची रेसिपी
साहित्य
आमचूर पावडर, पाणी, गूळ, लाल तिखट, मीठ, जिरे पूड, काळं मीठ
कृती
१. एका भांड्यामध्ये आमचूर पावडर घ्या. त्यामध्ये पाणी घालून त्याची पातळ पेस्ट तयार करा. अगदीच पातळ नको. त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
२. एका कढईमध्ये पाणी घ्या. ते जरा कोमट झाले की त्यामध्ये किसलेला गूळ घाला आणि तो विरघळेपर्यंत ढवळत राहा.
३. गूळ विरघळल्यावर आमचूर पावडरची पेस्ट घाला. ढवळून घ्या. त्यामध्ये लाल तिखट, मीठ, परतलेली जिरे पूड, काळं मीठ, साध मीठ सगळं घाला आणि ढवळा. चटणी जरा घट्ट झाली की गार करा. गार झाल्यावर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा.