भाज्या पाहून मुले डबा न खाताच घरी परत आणतात.(kids friendly healthy snacks) अशावेळी काय करावं असा प्रश्न पडतो. वाढत्या वयात मुलांना पौष्टिक पदार्थ खाऊ घालणे जास्त गरजेचे असते.(quick and easy tiffin recipe) डब्यात त्यांच्या आवडीचे पदार्थ दिले की, ते चवीने खातात.(lunchbox recipe for picky eaters) नेहमीच ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात काय बनवाव हा प्रश्न असतो. (homemade kabab for school lunch)झटपट आणि चविष्ट बनवता येणाऱ्या रेसिपी अनेक आहेत पण तेच तेच पदार्थ खाऊन आपल्यालाही वैताग येतो.(hara bhara kabab recipe for kids) अशावेळी मुलांसाठी पौष्टिक पदार्थ करायचा असेल तर आपण हराभरा कबाब ट्राय करु शकतो. यामध्ये शरीराला मिळणारे पुरेसे घटक असतात.(healthy lunchbox ideas for school) ज्यात प्रोटिन आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण जास्त आहे. तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी जाणून घेऊया. हरभरा कबाब पाहून मुले टिफिन आवडीने संपवतील. लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
तळल्यानंतर फ्रेंच फ्राईज नरम पडतात? सोपी ट्रिक, पावसाळ्यातही खाता येतील कुरकुरीत फ्राईज
साहित्य
पनीर - ७० ग्रॅमउकडलेले हिरवे वाटाणे - ५० ग्रॅमपालक - १०० ग्रॅमचिरलेला कोथिंबीर जिरे - १/२ चमचा जिरे पावडर - १/२ चमचाचाट मसाला - १/२ चमचातेलमीठ बेसन- १ ते २ चमचे दही - १०० ग्रॅमकाकडीचे बारीक तुकडे - २ ते ३ चमचे मस्टर्ड सॉस - १/२ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी हिरवे वाटाणे स्वच्छ करुन धुवून वाफवून घ्या. त्यानंतर पॅन गरम करुन त्यावर तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे तडतडू द्या. आता वाटाणे आणि पनीर घालून स्मॅश करुन घ्या.
2. त्यानंतर पालक बारीक चिरून ती सुद्धा धुवून वाफवून घ्या. त्यातील पाणी काढून स्मॅश केलेल्या मिश्रणात घाला. त्यात वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन,चाट मसाला मीठ आणि जिरे पावडर घाला.
3. एका बाऊलमध्ये दही घेऊन ते चांगले फेटून घ्या. आता त्यात चिरलेली काकडी आणि मस्टर्ड सॉस , चाट मसाला आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
4. वरील मिश्रण सगळे एकत्र करुन त्याची टिक्की तयार करा. ही टिक्की फ्राय करुन किंवा बेक करुन घ्या. तयार केलेल्या दह्याच्या सॉससोबत खा. यातून मुलांना प्रोटीन मिळेल आणि हा एक हेल्दी लंच बॉक्स तयार होईल.