Lokmat Sakhi >Food > गुलकंद करण्याची पाहा पारंपरिक पद्धत, लालचुटूक गुलाबाचा गारेगार पदार्थ-उन्हाळ्यात आवश्यक थंडावा!

गुलकंद करण्याची पाहा पारंपरिक पद्धत, लालचुटूक गुलाबाचा गारेगार पदार्थ-उन्हाळ्यात आवश्यक थंडावा!

Gulkand Recipe : How To Make Gulkand Recipe At Home : Homemade Gulkand : गावरान गुलाबांच्या पाकळ्यांचा मस्त गुलकंद, रोज एक चमचा खा आणि उन्हाळ्यातील शारीरिक समस्या विसरुन जा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2025 15:45 IST2025-03-12T15:37:16+5:302025-03-12T15:45:00+5:30

Gulkand Recipe : How To Make Gulkand Recipe At Home : Homemade Gulkand : गावरान गुलाबांच्या पाकळ्यांचा मस्त गुलकंद, रोज एक चमचा खा आणि उन्हाळ्यातील शारीरिक समस्या विसरुन जा...

Gulkand Recipe How To Make Gulkand Recipe At Home Homemade Gulkand | गुलकंद करण्याची पाहा पारंपरिक पद्धत, लालचुटूक गुलाबाचा गारेगार पदार्थ-उन्हाळ्यात आवश्यक थंडावा!

गुलकंद करण्याची पाहा पारंपरिक पद्धत, लालचुटूक गुलाबाचा गारेगार पदार्थ-उन्हाळ्यात आवश्यक थंडावा!

उन्हाळा ऋतू म्हटलं की वर्षभर खाता येणारे वाळवणाचे पदार्थ करण्याचा सिझन. उन्हाळ्यांत वर्षभर टिकणारे अनेक पदार्थ एकदाच फार मोठ्या प्रमाणावर केले जातात. या सगळ्या पदार्थांमध्ये केला जाणारा सगळ्यांच्या आवडीचा एक खास गोड शाही पदार्थ म्हणजे गुलाब पाकळ्यांचा 'गुलकंद'. ताज्या लालचुटुक गुलाबाच्या पाकळ्यांचा गोड गुलकंद (Gulkand Recipe) खायला कुणाला आवडत नाही. गुलकंदाचा डबा उघडला की गुलकंदाच्या दरवळणाऱ्या ( How To Make Gulkand Recipe At Home) सुगंधानेच मन प्रसन्न होत. एरवी वर्षभर गुलकंदाला कुणी विचारत नाही परंतु उन्हाळ्यात गुलकंद आवर्जून खाल्ला जातोच. शक्यतो, काही घरांमध्ये गुलकंद बाहेरुन विकत आणला जातो तर काही घरांमध्ये तो आजही पूर्वीची पारंपरिक पद्धत वापरुन तयार केला जातो( Homemade Gulkand).

गुलाब पाकळ्यांमधील सगळा पोषक अर्क गुलकंदात उतरलेला असतो. त्यामुळे अगदी वजन कमी करण्यापासून ते पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यापर्यंत अनेक बाबतीत गुलकंद उपयुक्त ठरतो. आयुर्वेदानुसार तर गुलकंदाला औषध म्हणून मान्यता देण्यात आली आहे. असा हा पौष्टिक गुलकंद घरीही तयार करता येतो. घरी तयार केलेल्या गुलकंदात कोणतीही रसायने किंवा इसेंन्स वापरण्यात आलेली नसतात. त्यामुळे हा गुलकंद प्रकृतीसाठी अतिशय उत्तम ठरतो. ही सोपी पद्धत (how to make gulkand) वापरून तुम्हीही घरच्याघरी गुलकंद तयार करू शकता.

साहित्य :- 

१. गुलाबाच्या पाकळ्या - २५० ग्रॅम 
२. खडीसाखरेची पूड - २०० ग्रॅम 
३. खसखस - १ टेबलस्पून 
४. बडीशेप - १ टेबलस्पून 
५. छोटी वेलची - ३ लहान वेलची 
६. काळीमिरी - २ ते ३ दाणे 
७. मध - १ टेबलस्पून 
८. पाणी - गरजेनुसार 

यंदा वाळवणात करा वर्षभर टिकणारी दही मिरची, तोंडी लावायला खास चमचमीत पदार्थ...


वाटीभर कुळीथ दळून करा अस्सल मालवणी पद्धतीचं पारंपरिक कुळथाचं पिठलं, करायला सोपे खायला पौष्टिक...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी एक मोठा बाऊल घेऊन त्यात पाणी ओतून घ्यावे. या पाण्यांत गुलाबाच्या पाकळ्या घालून त्या पाकळ्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. 
२. आता एका स्वच्छ सुती कापडावर या पाकळ्या अंथरून फॅनखाली ३० मिनिटे ठेवून व्यवस्थित सुकवून घ्याव्यात. 
३. या सुकलेल्या पाकळ्या एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन त्यात खडीसाखरेची बारीक पूड पसरवून घालावी. 
४. त्यानंतर ही खडीसाखरेची पूड गुलाबाच्या पाकळ्यांना व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने हातांनी कालवून एकजीव करुन घ्यावे. 
५. जोपर्यंत या पाकळ्यां खडीसाखरेचे पाणी सुटून पूर्णपणे ओल्या होत नाहीत, तोपर्यंत हलकेच हाताने मळून घ्यावे. 
६. आता एका मिक्सरच्या भांड्यात किंवा खलबत्त्यात खसखस, बडीशेप, छोटी वेलची, काळीमिरी घेऊन त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी. 

विकतसारखे मसाला ताक करण्यासाठी घरीच करा वर्षभर टिकणारा सिक्रेट मसाला, ताकाची चव वाढेल दुप्पट...

७. ही तयार पूड गुलाबांच्या पाकळ्यांवर घालावी त्यानंतर त्यात थोडा मध घालावा. आता सगळे जिन्नस एकजीव करून घ्यावे. 
८. हे तयार मिश्रण एका काचेच्या बरणीत भरावे. त्यानंतर या बरणीला झाकण लावण्याऐवजी सुती कापडाने बरणीचे तोंड झाकून ठेवावे. अशी बरणी ३ ते ४ दिवस ऊन्हात ठेवून गुलकंद तयार करून घ्यावा. 
९. दरवेळी ही बरणी उन्हात ठेवताना आतील गुलकंद चमच्याने हलवून वर खाली करून व्यवस्थित हलवून घ्यावा. 

गुलकंद खाण्यासाठी तयार आहे. आपण हा गुलकंद वर्षभर स्टोअर करून देखील ठेवू शकतो.

Web Title: Gulkand Recipe How To Make Gulkand Recipe At Home Homemade Gulkand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.