Join us

गुढी पाडव्यासाठी घरीच करा साखरेच्या गाठी, सोपी पद्धत - साखरेची माळ करा सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2025 18:05 IST

Gudhi Padwa special recipe: How to make sakharecha haar gathi: Traditional Gudhi Padwa sweets: Sakharecha haar gathi recipe: Simple Gudhi Padwa recipes: Unique Gudhi Padwa dish at home: Homemade sakharecha haar gathi: Gudhi Padwa kitchen hacks: या पारंपरिक पद्धतीच्या गाठी कशा बनवायच्या पाहूया सोपी पद्धत

गुढी पाडवा हा हिंदू वर्षातील सगळ्या मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी दारोदारी गुढी उभारल्या जातात.(Gudhi Padwa special recipe) मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यातील गुढीपाडव्याच्या सणाने होते. हा सण हिंदू नववर्षातील पहिला सण मानला जातो. नवीन वर्षाचे स्वागत अगदी जल्लोषात केले जाते. (How to make sakharecha haar gathi)गुढी उभारण्यासाठी एका उंच काठीला रेशमाच्या खणाचे वस्त्र बांधतात.(Traditional Gudhi Padwa sweets) त्यावर चांदीचा गडू उपडा ठेवून, कडुनिंबाची डहाळी, आंब्याची पाने, झेंडूचा हार आणि साखरेची गाठी बांधतात. (Sakharecha haar gathi recipe) गुढीपाडव्याच्या दिवशी साखरेची गाठी आणि कडुनिंबाच्या पानांना अधिक महत्त्व असते. तर रंगबेरंगी साखरेच्या गाठी गुढीला लावून त्याची मनोभावे पूजा केली जाते. 

फूड कलर नको की कंडेन्स्ड मिल्क नको, करा रसाळ गोमट्या फणसाचे आईस्क्रीम, पाहा रेसिपी

गुढीपाडव्याच्या सणानिमित्त बाजारपेठांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुढी, प्लास्टिकचे किंवा झेंडूचे हार, वस्त्र, तांब्याचा गडू आपल्याला पाहायला मिळतो. तर साखरेच्या गाठीचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. रंगबेरंगी किंवा अनेक आकर्षित आणि युनिक नक्षीकाम केलेले चित्र असलेल्या गाठींची खरेदी केली जाते.(Homemade sakharecha haar gathi) साखरेच्या गाठी बनवणे फार सोपे होते. अनेकदा घाईगडबडीत आपण पूजेच्या सामानात साखरेच्या गाठी घायला विसरतो. अशावेळी आपली गल्लत होते. आपण आपल्या आवडीनुसार विविध रंगांच्या, आकाराच्या साखरेच्या गाठी झटपट तयार करु शकतो. या पारंपरिक पद्धतीच्या गाठी कशा बनवायच्या पाहूया सोपी पद्धत 

साहित्य 

धागा साखर - १ कप पाणी - १/२ कप तूप - १ चमचा खाण्याच रंग 

कृती 

1. सगळ्यात आधी अप्प्यांच्या भांड्याला तेल लावून ग्रीस करुन घ्या. यामध्ये धागा घालून ठेवा. 

2. आता एका पॅनमध्ये साखर घेऊन त्यात पाणी घालून चांगले उकळवून घ्या. एकतारी पाक तयार होईल. 

3. पाक घट्ट तयार झाल्यानंतर गॅस बंद करुन त्यात चमचाभर तूप आणि आवडता खाण्याचा रंग घालून चांगले मिक्स करा.  4. त्यानंतर हा पाक अप्प्याच्या भांड्यात टाकून सेट होऊ द्या. थंड झाल्यानंतर तयार होईल साखरेची गाठी. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीगुढीपाडवा