Lokmat Sakhi >Food > नाश्त्याला करा 'हिरव्या मिरचीचा पराठा', खमंग-खुसखुशीत पदार्थ- शाळेच्या डब्यासाठीही खास खाऊ

नाश्त्याला करा 'हिरव्या मिरचीचा पराठा', खमंग-खुसखुशीत पदार्थ- शाळेच्या डब्यासाठीही खास खाऊ

spicy paratha for breakfast: healthy paratha for kids: हिरव्या मिरचीचे वाटण घालून तयार केला जातो. ही आगळी-वेगळी रेसिपी कशी बनवायची पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2025 09:35 IST2025-06-25T09:30:00+5:302025-06-25T09:35:01+5:30

spicy paratha for breakfast: healthy paratha for kids: हिरव्या मिरचीचे वाटण घालून तयार केला जातो. ही आगळी-वेगळी रेसिपी कशी बनवायची पाहूया.

green chili paratha recipe spicy breakfast school tiffin special recipe flavorful green chili flatbread | नाश्त्याला करा 'हिरव्या मिरचीचा पराठा', खमंग-खुसखुशीत पदार्थ- शाळेच्या डब्यासाठीही खास खाऊ

नाश्त्याला करा 'हिरव्या मिरचीचा पराठा', खमंग-खुसखुशीत पदार्थ- शाळेच्या डब्यासाठीही खास खाऊ

अलीकडे सगळ्याच ठिकाणी पराठा फेमस झाला आहे. विविध पदार्थ घालून त्याला आणखी स्वादिष्ट बनवले जाते. (Breakfast recipe)सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत पराठा हा पदार्थ खाल्ला जातो. वरुन तुपाची धार आणि लोण्याच्या गोळ्यासोबत त्याची चव चाखता येते.(Paratha Recipe) विविध प्रातांनुसार त्याची ख्याती देखील बदलते. उत्तर कर्नाटकात बेळगावमध्ये तिथे भेळ मिळते जिचे नाव आहे अलाश्री. यामध्ये घातला जाणारा मसाला चवीला वेगळा असतो. (healthy paratha for kids)
मुलांच्या डब्यात काय द्यायचे? प्रवासात भरपूर दिवस टिकता येईल असे पदार्थ आपण नेहमीच पाहत असतो. परंतु, हा पराठा बनवायला अगदी सोपा आणि चविष्ट आहे.(spicy paratha for breakfast) यामध्ये हिरव्या मिरचीचे वाटण घालून तयार केला जातो. ही आगळी-वेगळी रेसिपी कशी बनवायची पाहूया. 

उडीदाच्या डाळीचे खमंग वरण, गरमागरम भातासोबत खा- पाहा पारंपरिक रेसिपी, पावसाळा स्पेशल

साहित्य 

हिरव्या मिरच्या- २ ते ३
कोथिंबीर - १ कप 
जिरे - १ चमचा 
आले - १ इंच 
धने पावडर - १ चमचा 
पांढरी डाळ - मूठभर 
मीठ - चवीनुसार 
लाल तिखट - १ चमचा 
मळलेल कणिक 
तूप 
लिंबू 


कृती 

1. सगळ्यात आधी कणिक चांगले व्यवस्थित मळून घ्या. त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीरसह वरील सर्व साहित्य वाटून घ्या. 

2. वाटलेलं सर्व साहित्य एका वाटीत काढून त्यावर लिंबू पिळा. चमच्याने लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स करुन घ्या. 

3. आता या मिश्रणाचे छोटे गोळे तयार करा. कणकेचा गोळा घेऊन त्यात मसाल्याचा गोळा भरा. मोदकासारखी पारी करुन या गोळ्याला बंद करा. 

4. त्यानंतर हा गोळा पीठ लावून व्यवस्थित चपातीसारखा थोडा जाडसर लाटा. तवा गरम झाल्यानंतर हा पराठा भाजून घ्या. वरुन तूप लावून पुन्हा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजा. खमंग-कुरकुरीत होईपर्यंत भाजा. मुलांच्या डब्यात द्या पौष्टिक खाऊ. 
 

Web Title: green chili paratha recipe spicy breakfast school tiffin special recipe flavorful green chili flatbread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.