थंडीच्या दिवसांत बाजारात आवळ्याची आवक मोठ्या प्रमाणावर होते. व्हिटॅमिन 'सी' चा खजिना असलेला आवळा हा आरोग्यासाठी फार फायदेशीर असतो. थंडीत होणारे सर्दी, खोकला आणि घशाची खवखव यांसारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे, आणि यासाठी आवळा एक नैसर्गिक संरक्षक म्हणून उपयुक्त ठरतो. परंतु अनेकदा आवळा (Avlyachi Daal Recipe) खाण्याचा कंटाळा येतो किंवा त्याची चव आवडत नाही. अशा वेळी आवळ्याचे सर्व आरोग्यदायी फायदे मिळावे म्हणून, सोबतच जिभेचे चोचले पुरवणारा एक पारंपरिक आणि चविष्ट पर्याय म्हणजे 'आवळ्याची आंबट - गोड चवीची डाळ'...
आवळ्याच्या आंबट-तुरट चवीसोबत डाळीतील पौष्टिक घटक आणि मसाल्यांचा सुगंध एकत्र आल्याने तयार होणारी ही डाळ फक्त उत्कृष्ट चवीची नसते, तर थंडीत शरीराला आतून ऊब देऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील मदत करते. थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता, ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती देणाऱ्या पारंपरिक (Gooseberry Dal Recipe) आणि पौष्टिक पदार्थांमध्ये ‘आवळ्याची डाळ’ म्हणजे एक सुपरफूड मानलं जातं. थंडीत तयार करायला झटपट, खायला पौष्टीक आणि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर अशी आवळ्याची डाळ नक्कीच आहारात असायलाच हवी. आवळ्याची चटपटीत (Amla Dal Recipe) आंबट - गोड चवीची डाळ करण्याची सोपी रेसिपी...
साहित्य :-
१. पिवळी तूर डाळ - १ कप
२. टोमॅटो - १/२ कप (मध्यम तुकडे केलेले)
३. आवळ्याचे तुकडे - १/२ कप (मध्यम तुकडे केलेले)
४. कडीपत्ता - १० ते १२ पाने
५. लसूण पाकळ्या - ५ ते ६
६. हिरव्या मिरच्या - १ मिरच्या
७. पाणी - २ कप
८. हळद - चिमूटभर
९. साजूक तूप - १ टेबलस्पून
१०. जिरे - १/२ टेबलस्पून
११. मोहरी - १/२ टेबलस्पून
१२. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून
१३. धणेपूड - १/२ टेबलस्पून
१४. हिंग - १/२ टेबलस्पून
१५. कोथिंबीर - २ टेबलस्पून
कृती :-
१. सगळ्यातआधी प्रेशर कुकरमध्ये पिवळी तूर डाळ स्वच्छ धुवून घालावी. मग यात टोमॅटो आणि आवळ्याचे मध्यम आकाराचे तुकडे घालावेत.
२. मग यात कडीपत्ता, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि गरजेनुसार पाणी घालावे. याचबरोबर हळद आणि साजूक तूप घालून ३ ते ४ शिट्ट्या काढून डाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी.
ना साय फेटण्याची झंझट, ना लोणी कढवण्याचे टेंन्शन! फक्त एका ट्रिकने होईल घट्ट - रवाळ साजूक तूप...
परभणीची कच्च्या फोडणीची चमचमीत खिचडी करण्याची भन्नाट रेसिपी, गरमागरम खिचडी त्यावर तूप.. चव जबरदस्त..
३. डाळ प्रेशर कुकरमध्ये व्यवस्थित शिजवून झाल्यावर कुकरचे झाकण उघडून रवीने हलकेच दाबून मॅश करून घ्यावी.
४. एका पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, लसूण पाकळ्या, हळद, लाल तिखट मसाला, धणेपूड, हिंग व चवीनुसार मीठ घालून खमंग अशी फोडणी तयार करुन घ्यावी. तयार फोडणीत थोडे पाणी घालून ती पातळ करुन घ्यावी. मग ही तयार फोडणी शिजवून घेतलेल्या डाळीत वरुन घालावी.
५. सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घालावी.
मस्त गरमागरम अशी आंबट - गोड चवीची, पौष्टिक अशी आवळा डाळ खाण्यासाठी तयार आहे. चपाती, भात, भाकरीसोबत आपण ही डाळ खाऊ शकता.
