Lokmat Sakhi >Food > कोकणात गणपतीच्या नैवैद्याला करतात तशी वाटपाची डाळ करा, चव पारंपरिक आणि खाणं म्हणजे सुख!

कोकणात गणपतीच्या नैवैद्याला करतात तशी वाटपाची डाळ करा, चव पारंपरिक आणि खाणं म्हणजे सुख!

Konkani recipes: Traditional Konkani food: Konkani naivedya thali: सतत तुरीची डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर वाटपाची डाळ करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2025 17:19 IST2025-08-25T17:18:16+5:302025-08-25T17:19:02+5:30

Konkani recipes: Traditional Konkani food: Konkani naivedya thali: सतत तुरीची डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर वाटपाची डाळ करुन पाहा.

ganesh festival How to make traditional Konkani vatapachi dal at home Maharashtrian naivedya recipes Homemade Konkani dal recipe | कोकणात गणपतीच्या नैवैद्याला करतात तशी वाटपाची डाळ करा, चव पारंपरिक आणि खाणं म्हणजे सुख!

कोकणात गणपतीच्या नैवैद्याला करतात तशी वाटपाची डाळ करा, चव पारंपरिक आणि खाणं म्हणजे सुख!

वाफळता भात त्यावर गरमागरम वरण आणि वरुन तुपाची धार असं जेवण भारतीय घरांमध्ये हमखास खाल्ल जातं. भारतीय थाळी ही वरण-भाताशिवाय अपूर्ण आहे.(Dal Recipe) जेवणात आपण विविध प्रकारच्या डाळी खातो. पण डाळ बदलली की, त्याची चव देखील बदलते. (Konkani recipes)
गरमागरम भातासोबत तुरीच्या डाळीची आमटी रोजच खाल्ली जाते पण कधी वाटपाची डाळ खाल्ली आहे का?. वाटपाची डाळ ही कोकणाील पारंपरिक व खास डिश आहे.(Traditional Konkani food) सण-समारंभ, हळदीकुंकू किंवा नैवेद्याच्या ताटात ही डाळ हमखास केली जाते.(Konkani naivedya thali) चण्याची डाळ, ओले खोबरे आणि मसाले घालून याची चव वाढवली जाते.(Festive dal recipe) ही डाळ पचायला हलकी आणि सोपी असते. वाटपाचे वरण हे अगदी काही मिनिटांत तयार होते.(Maharashtra traditional food) जर सतत तुरीची डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर वाटपाची डाळ करुन पाहा.(Easy dal recipe Konkani style) सध्या घरोघरी गणपतीचे देखील आगमन होणार आहे, अशावेळी नैवेद्याच्या पानांत हा पदार्थ हमखास वाढा. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. (Authentic Konkani dishes)

बेसन कच्चं राहातं- लाडू टाळूला चिकटतो? बेसन भाजण्यासाठी ५ टिप्स - लाडू होईल रवाळ- दाणेदार

साहित्य

चण्याची डाळ - १ वाटी 
मूगडाळ - १ वाटी 
टोमॅटो - १ 
हिरवी मिरची -५
मोहरी - १ चमचा 
जिरे - १ चमचा 
हिंग - १ चमचा 
कढीपत्त्याची पाने
लसूण पेस्ट 
ओले खोबरे - १ छोटी वाटी 
लसूण पाकळ्या
कोथिंबीर 
हळद - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 

कोथिंबीर लवकर सडते - पाने पिवळी पडतात? सोपी ट्रिक, आठवडाभर फ्रीजशिवाय राहिल ताजी-हिरवीगार

कृती 

1. सगळ्यात आधी चण्याची डाळ आणि मूगाची डाळ स्वच्छ करुन घ्या. मिक्स करुन व्यवस्थित धुवून घ्या. त्यात कपभर पाणी घाला. आता टोमॅटोचे बारीक तुकडे, मिरचे तुकडे डाळीमध्ये घाला. ही डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. 

2. आता पॅनमध्ये तेल चांगले तापवून घ्या. त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता तडतडू द्या. वरुन लसणाच पेस्ट घाला. व्यवस्थित परतवून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचा किस जिरे, लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून वाटण तयार करा. तयार वाटण फोडणी दिलेल्या साहित्यात घाला. त्यात हळद घालून चांगले परतवून घ्या.

3. डाळ रवीने घोटून घ्या. तयार फोडणीच्या साहित्यात डाळ घाला आणि वरुन थोडे पाणी घाला. वरुन मीठ आणि कोथिंबीर घालून छान उकळून घ्या. भातासोबत खा गरमागरम वाटपाच्या डाळीचे वरण. 


Web Title: ganesh festival How to make traditional Konkani vatapachi dal at home Maharashtrian naivedya recipes Homemade Konkani dal recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.